कळंब – डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ,छत्रपती संभाजीनगर संलग्नित छत्रपती शिवाजी महाविद्यालय,कळंब व रा.से.यो./आयक्युएसी विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने दि.१५ ऑगस्ट २०२६ रोजी ७९ वा स्वातंत्र्य दिन ध्वजारोहण सोहळा महाविद्यालयात मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाच्या प्रमुख पाहुण्यांमध्ये संस्थेचे सचिव शिवाजी (आप्पा) कापसे,अध्यक्ष शाम (नाना) खबाले,सहसचिव प्रा. संजयजी घुले, डॉ.नंदकिशोर मोरे, विजय गुंजाळ तसेच प्राचार्य डॉ. हनुमंत माने यांचा समावेश होता. मान्यवरांच्या हस्ते राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.यानंतर शिवाजी (आप्पा) कापसे यांनी ध्वजारोहण करून ध्वजाला सलामी दिली. या प्रसंगी प्राचार्य डॉ.हनुमंत माने, आयक्युएसी समन्वयक प्रा. अनिल जगताप,एनएसएस कार्यक्रम अधिकारी प्रा.सौ.मनिषा कळसकर,महाविद्यालयातील प्राध्यापकवर्ग,शिक्षकेत्तर कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. स्वातंत्र्य दिनानिमित्त “तंबाखूमुक्ती शपथ” अभियानांतर्गत सर्वांनी तंबाखूमुक्तीची शपथ घेतली. क्रिडा शिक्षक प्रा. शिव खबाले यांनी शपथ देऊन महाविद्यालय परिसर तंबाखूमुक्त ठेवण्याचे आवाहन केले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सर्व शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी व विद्यार्थ्यांचे मोलाचे सहकार्य लाभले.
More Stories
कळंब खरेदी-विक्री संघाची निवडणूक जाहीर;१८ एप्रिलला मतदान
गुढीपाडवा उपक्रमातून शिक्षणाची नवी सुरुवात;चिमुकल्यांनी भरली शाळा
भिमा हगारे यांची राष्ट्रवादी युवक काँग्रेस तालुकाध्यक्षपदी निवड