March 26, 2026

संभाजी विद्यालय,पिंपळगाव (लिंगी) येथे स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा

  • वाशी – पिंपळगाव (लिंगी) येथील संभाजी विद्यालयात दि. १५ ऑगस्ट २०२५ रोजी स्वातंत्र्य दिन सोहळा मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.
    कार्यक्रमाच्या प्रारंभी ग्रामपंचायत सदस्य भारत रंगनाथ बोरकर, शालेय समिती अध्यक्ष पंडीतराव कोल्हे, सदस्य दिलीप कुलकर्णी, शिवाजीराव सुकाळे व निमंत्रित सदस्य पांडुरंग लावंड यांच्या हस्ते प्रतिमापूजन करण्यात आले. त्यानंतर प्रशालेचे मुख्याध्यापक युवराज सावंत यांनी ध्वजारोहण केले.या प्रसंगी स्थानिक संस्थेचे प्रशासकीय अधिकारी, ग्रामस्थ तसेच विद्याभवन हायस्कूल, कळंब येथील सेवानिवृत्त सेवक व मूळ रहिवासी खंडागळे आश्रुबा यांची विशेष उपस्थिती होती.
    कार्यक्रमात रांगोळी स्पर्धेतील विजेत्या विद्यार्थ्यांना बक्षीस वितरण करण्यात आले. यात प्रथम क्रमांक रुपाली प्रकाश तावरे, द्वितीय प्रज्ञा प्रविण गाडे, तृतीय क्रमांक आर्या प्रदीप जोंधळे यांना तर प्रतिक्षा प्रताप तावरे व वैष्णवी धोंडीराम सुकाळे यांनाही पारितोषिके देण्यात आली. ही बक्षिसे येडबा पटाडे (पेंटर) यांच्या तर्फे देण्यात आली. तसेच इयत्ता ९ वी साठी ग्रीन बोर्ड भेट देण्यात आला.
    कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी सांस्कृतिक विभाग प्रमुख सुहास जगताप, शिक्षक सुनील बावकर, संतोष ढोले, संतोष बोडके, शिक्षकेत्तर कर्मचारी व पत्रकार शिवराम शिंदे फुरडे यांनी परिश्रम घेतले.
    शेवटी सर्व विद्यार्थ्यांना गोड खाऊ वाटप करून सोहळ्याची सांगता करण्यात आली.
error: Content is protected !!