August 8, 2025

भाजपा प्रदेश कार्यकारिणी सदस्यपदी प्रवीण पाठक

  • धाराशिव- भारतीय जनता पार्टीच्या महाराष्ट्र प्रदेश कार्यकारणी सदस्यपदी धाराशिव नगर परिषदेचे माजी स्वीकृत सदस्य प्रवीण पाठक यांची निवड करण्यात आली आहे. पक्षश्रेष्ठींच्या मार्गदर्शनानुसार प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी ही निवड केली आहे.
    धाराशिव येथे नुकत्याच झालेल्या भारतीय जनता पार्टीच्या जिल्हास्तरीय बैठकीत भाजपचे मराठवाडा संघटन मंत्री संजय कौडगे,मा.आमदार सुजितसिंह ठाकुर,जिल्हाध्यक्ष संताजी चालुक्य पाटील,लोकसभा संयोजक नितिन काळे यांच्या हस्ते निवडीचे पत्र पाठक यांना देण्यात आले. निवडीनंतर पाठक यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष राजसिंहा राजेनिंबाळकर, किसान मोर्चाचे महाराष्ट्र प्रदेश सचिव रामदास कोळगे, महिला मोर्चाच्या अस्मिता कांबळे यांच्यासह भारतीय जनता पार्टी, युवा मोर्चाचे पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते. भारतीय जनता पार्टीच्या प्रदेश कार्यकारिणी सदस्यपदी पाठक यांच्या निवडीचे कार्यकर्त्यांमधून स्वागत होत आहे
error: Content is protected !!