धाराशिव शहर वाहतुक शाखा व संबंधीत पोलीस ठाण्यांनी महत्त्वाच्या रस्त्यांवर दि.24 नोव्हेंबर रोजी मोटार वाहन कायदा- नियम भंग प्रकरणी एकुण 118 कारवाया करुन 65,800 ₹‘तडजोड शुल्क’वसुल केले आहे.
“रहदारीस धोकादायरीत्या वाहन उभे करणाऱ्यावर गुन्हा नोंद.”
धाराशिव ग्रामीण पोलीस ठाणे : आरोपी नामे-1)लक्ष्मण नेताजी ईटकर, वय 38 वर्षे, रा. रामलिंग नगर येडशी ता.जि. धाराशिव यांनी दि.24.11.2023 रोजी 15.45 वा. सु. आपल्या ताब्यातील ॲपेरिक्षा क्र एमएच 25 एन 0278 हे येडशी टोल नाक्याहुन धाराशिव जाणारे एनएच 52 रोडवर सार्वजनिक रस्त्यावर रहदारीस धोकादायकरीत्या उभे केलेले असताना धाराशिव ग्रामीण पोलीसांना मिळून आला. यावरुन पोलीसांनी सरकारतर्फे दिलेल्या प्रथम खबरेवरुन नमूद व्यक्तीविरुध्द भा.द.स. कलम 283 अन्वये धाराशिव ग्रामीण पो.ठा. येथे गुन्हा नोंदवला आहे.
लोहारा पोलीस ठाणे : आरोपी नामे-1)महम्मद बाबुलाल इनामदार, वय 35 वर्षे, रा. बलसुर ता. उमरगा जि. धाराशिव यांनी दि.24.11.2023 रोजी 16.00 वा. सु. आपल्या ताब्यातील वाहन हे सास्तुर गावातील वेशी जवळ सास्तुर ते बलसुर जाणारे रोडवर सार्वजनिक रस्त्यावर रहदारीस धोकादायकरीत्या उभे केलेले असताना लोहारा पोलीसांना मिळून आला. यावरुन पोलीसांनी सरकारतर्फे दिलेल्या प्रथम खबरेवरुन नमूद व्यक्तीविरुध्द भा.द.स. कलम 283 अन्वये लोहारा पो.ठा. येथे गुन्हा नोंदवला आहे.
आंबी पोलीस ठाणे : आरोपी नामे-1)देविप्रसाद सिताराम डुकळे, वय 34 वर्षे, रा. उंडेगाव ता. परंडा जि. धाराशिव यांनी दि.24.11.2023 रोजी 19.15 वा. सु. आपल्या ताब्यातील वाहन हे ताकमेडवाडी चौकात सार्वजनिक रस्त्यावर रहदारीस धोकादायकरीत्या उभे केलेले असताना आंबी पोलीसांना मिळून आला. यावरुन पोलीसांनी सरकारतर्फे दिलेल्या प्रथम खबरेवरुन नमूद व्यक्तीविरुध्द भा.द.स. कलम 283 अन्वये आंबी पो.ठा. येथे गुन्हा नोंदवला आहे.
उमरगा पोलीस ठाणे : आरोपी नामे-1)सिध्देश्वर राजेंद्र स्वामी, वय 31 वर्षे, रा. चिंचकोट, ता. उमरगा जि. धाराशिव यांनी दि.24.11.2023 रोजी 18.45 वा. सु. आपल्या ताब्यातील रिक्षा क्र एमएच 25 ऐ. के. 0491 हा एन एच 52 रोडवर बसस्थानक समोरील रोडवर मध्यभागी उमरगा येथे सार्वजनिक रस्त्यावर रहदारीस धोकादायकरीत्या उभे केलेले असताना उमरगा पोलीसांना मिळून आला. यावरुन पोलीसांनी सरकारतर्फे दिलेल्या प्रथम खबरेवरुन नमूद व्यक्तीविरुध्द भा.द.स. कलम 283 अन्वये उमरगा पो.ठा. येथे गुन्हा नोंदवला आहे.
“ मालमत्तेविरुध्द गुन्हे.”
उमरगा पोलीस ठाणे : फिर्यादी नामे- गणपती उाप्पाराव गाडेकर, वय 39 वर्षे, रा. शिवपुरी कॉलनी उमरगा ता. उमरगा, जि. धाराशिव यांचे बायपास उमरगा येथील शेत सर्वे नं 331 मधील शेतामधील सोयाबीनचे 10 कट्टे अंदाजे 15,000₹, ज्वारी 01 कट्टा अंदाजे 2,000₹, गहु 02 कट्टे अंदाजे 5,000₹ असा एकुण 22,000₹ किंमतीचा माल अज्ञात व्यक्तीने दि. 22.11.2023 रोजी सायंकाळी 19.00 ते दि. 23.11.2023 रोजी 06.00 वा. सु. अज्ञात व्यक्तीने चोरुन नेला. अशा मजकुराच्या फिर्यादी नामे- गणपती गाडेकर यांनी दि.24.11.2023 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन उमरगा पो. ठाणे येथे कलम 379 भा.दं.वि.सं. अन्वये गुन्हा नोंदवला आहे.
कळंब पोलीस ठाणे : फिर्यादी नामे- अमृता विनायक बेडगे, वय 38 वर्षे, रा. बी 101 लेक्वीस्टा जांभुळवाडी रोड आंबेगाव पुणे जि. पुणे या दि. 20.11.2023 रोजी छत्रपती संभाजीनगर येथुन बसने प्रवास करुन 13.00 वा. सु. कळंब बसस्थानक येथे अमृता बेडगे यांचे पर्स मधील 98 ग्रॅम वजनाचे सोन्याच्या दागिण्याचा बॉक्स अज्ञात व्यक्तीने गर्दीचा फायदा घेवून चोरुन नेला. अशा मजकुराच्या फिर्यादी नामे- अमृता बेडगे यांनी दि.24.11.2023 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन कळंब पो. ठाणे येथे कलम 379 भा.दं.वि.सं. अन्वये गुन्हा नोंदवला आहे.
ढोकी पोलीस ठाणे : फिर्यादी नामे- रुपेश शंकर शिंदे, वय 41 वर्षे, व्यवसाय- बसचालक न 263 कराड आगार, रा. कुंडाळे ता. कराड जि. सातारा हे दि. 23.11.2023 रोजी रात्री 12.00 वा. सु. दि. 24.11.2023 रोजी 09.30 वा. सु. बस क्र एमएच 14 बी.टी. 4431 ही लातुर येथुन कराड कडे जात होते. दरम्यान नमुद बस ही ढोकी येथे उभ्या केलेली असताना अज्ञात व्यक्तीने बसचे डिझेल टाकातील अंदाजे 110 ते 120 लि. डिझेल एकुण 10,600₹ किंमतीचे चोरुन नेले. अशा मजकुराच्या फिर्यादी नामे- रुपेश शिंदे यांनी दि.24.11.2023 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन ढोकी पो. ठाणे येथे कलम 379 भा.दं.वि.सं. अन्वये गुन्हा नोंदवला आहे.
“ मारहाण.”
बेंबळी पोलीस ठाणे :आरोपी नामे- 1)पांडुरंग उत्तम कदम, 2) उत्तम तुळशीराम कदम, 3) बाळु तुळशीराम कदम 4) रामेश्वर श्रीमंत, 5)ज्ञानेश्वर श्रीमंत भोसले, 6)तुकाराम धोंडीराम भोसले, 7) नारायण सुदाम भोसले सर्व रा. नितळी ता. जि. धाराशिव यांनी दि.21.11.2023 रोजी 07.30 वा. सु. नितळी शिवार येथील सामाईक बांधावर फिर्यादी नामे-शंकर लिंबराज लोंढे, वय 55 वर्षे, रा. नितळी, ता. जि. धाराशिव यांना नमुद आरोपीने गैरकायद्याची मंडळी जमवून बांधावर म्हैस बांधण्याचे कारणावरुन फिर्यादीस शिवीगाळ करुन लाथाबुक्यांनी, कुह्राड व काठीने मारहान केली. अशा मजकुराच्या फिर्यादी- शंकर लोंढे यांनी दि.24.11.2023 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन बेंबळी पो. ठाणे येथे कलम 324, 323, 143, 147, 149 भा.दं.वि.सं. अन्वये गुन्हा नोंदवला आहे.
ढोकी पोलीस ठाणे :आरोपी नामे- 1)मनिषा नारायण फेरे, 2) रुंदा भेरु फेरे, 3) नारायण रघुनाथ फेरे, तिघे रा. तावरजखेडा ता. जि. धाराशिव यांनी दि. 23.11.2023 रोजी 18.00 वा. सु. तावरजखेडा शिवारातील शेत गट नं 10 मध्ये फिर्यादी नामे- रघुनाथ शिवमुर्ती फेरे, वय 70 वर्षे, रा. तावरजखेडा ता. जि. धाराशिव यांना कौटुबिक वादाचे कारणावरुन नमुद आरोपींनी शिवीगाळ करुन लाथाबुक्यांनी, काठीने मारहाण करुन जखमी केले. व जिवे ठार मारण्याची धमकी दिली. अशा मजकुराच्या फिर्यादी- रघुनाथ फेरे यांनी दि.24.11.2023 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन ढोकी पो. ठाणे येथे कलम 324, 323, 504, 506, 34 भा.दं.वि.सं. अन्वये गुन्हा नोंदवला आहे.
परंडा पोलीस ठाणे :आरोपी नामे- 1)लताबाई सुभाष जाधवर, 2) संगिता सुभाष जाधवर, 3) पुजा सुभाष जाधवर, 4) भाग्यश्री (पुर्ण नाव माहित नाही) रा. तांबेवाडी, ता. भुम जि. धाराशिव यांनी दि. 12.11.2023 रोजी 09.30 वा. सु. तांबेवाडी येथे फिर्यादी नामे- तुकाराम हरिदास जाधवर, वय 37 वर्षे, रा. तांबेवाडी, ता. भुम जि. धाराशिव यांचे आई छबाबाई व पत्नी आरती यांना जागेच्या वादाचे कारणावरुन नमुद आरोपींनी शिवीगाळ करुन लाथाबुक्यांनी मारहाण करत असताना फिर्यादी हे भांडण सोडवण्यास गेले असता नमुद आरोपींनी फिर्यादीचे दंडाला व मनगटावार चावा घेवून गंभीर जखमी केले. व जिवे ठार मारण्याची धमकी दिली. अशा मजकुराच्या फिर्यादी- तुकाराम जाधवर यांनी दि.24.11.2023 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन परंडा पो. ठाणे येथे कलम 325, 323, 504, 506, 34 भा.दं.वि.सं. अन्वये गुन्हा नोंदवला आहे.
येरमाळा पोलीस ठाणे :आरोपी नामे- 1) कैलास उत्तम गोंदरे, 2) सुनिल भारत काळुंके दोघे रा. नांदुरघाट ता. केज जि. बीड यांनी दि. 24.11.2023 रोजी 18.30 वा. सु. एनएच 52 हायवे रोडवर येरमाळा येथील सर्वीस रोडवर हायवे बिअर बारचे समोर फिर्यादी नामे- अश्रुबा भिमराव गिरे, वय 32 वर्षे, रा. ईटकुर ता. कळंब जि. धाराशिव हे त्यांचे वाहन पिकअप क्र एमएच 13 सी. यु. 7808 मध्ये शेतकऱ्याची डिपी घेवून ईटकुर येथे जात होते दरम्यान एनएच 52 हायवे रोडवर येरमाळा येथील सर्वीस रोडवर हायवे बिअर बारचे समोर नमुद आरोपी रोडवर भांडण करत असताना फिर्यादीने नमुद आरोपीस तुम्ही रोडवर भांडण का करता असे विचारल्याचे कारणावरुन नमुद आरोपीने फिर्यादीस शिवीगाळ करुन लाथाबुक्यांनी मारहाण करुन हातातील दगड पिकअपवर मारुन काच फोडून फिर्यादीचे 15,000₹ चे नुकसान केले. अशा मजकुराच्या फिर्यादी- अश्रुबा गिरे यांनी दि.24.11.2023 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन येरमाळा पो. ठाणे येथे कलम 336, 323, 504, 427, 34 भा.दं.वि.सं. अन्वये गुन्हा नोंदवला आहे.
“ रस्ता अपघात.”
तुळजापूर पोलीस ठाणे : आरोपी नामे- अनिकेत आनंद देडे, सोबत मयत नामे- वैशाली आनंद देडे, वय 35 वर्षे, रा. मातंग नगर शुक्रवार पेठ तुळजापूर जि. धाराशिव हे दोघे दि. 02.10.2023 रोजी 18.30 वा. सु. तिर्थ खुर्द पाटीचे जवळ नळदुर्ग ते तुळजापूर रोडवरुन मोटरसायकल क्र एमएच 25 ए झेड 1519 वर बसून जात होते. दरम्यान अनिकेत देडे यांनी त्याचे ताब्यातील मोटरसायकल ही भरधाव वेगावत निष्काळजीपणे चालवुन रोडवरील खड्यात आदळल्याने वैशाली देडे या मोटरसायकलवरुन खाली पडून आपघात होवून गंभीर जखमी होवून उपचार दरम्यान मयत झाल्या. अशा मजकुराच्या फिर्यादी- यशवंत संभाजी डोलारे, वय 50 वर्षे, रा. मसला खुर्द ता. तुळजापूर जि. धाराशिव यांनी दि.24.11.2023 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.वि.सं. कलम- 279, 337, 304 (अ) सह मोवाका 184 अन्वये गुन्हा नोंदवला आहे.
More Stories
संचालिका सौ.अंजली मोहेकर यांची विद्याभवन प्राथमिक विद्यामंदिरास सदिच्छा भेट
मोहेकर महाविद्यालयात ग्रंथालय शास्त्राच्या राष्ट्रीय चर्चासत्राचे आयोजन
भीमराव दादा सत्यवचनी व्यक्तिमत्व होतं – डॉ. माणिक डिकले