March 26, 2026

विद्यामंदिर हायस्कूल आष्टा येथे ७९ वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा

  • आष्टा – ज्ञान प्रसारक मंडळ येरमाळा चे सचिव डॉ.अशोकराव मोहेकर यांच्या प्रेरणेने व मुख्याध्यापक आनंद रामटेके यांच्या मार्गदर्शनाखाली १५ ऑगस्ट २०२५ रोजी विद्यामंदिर हायस्कूल आष्टा,ता.भूम,जि. धाराशिव येथे ७९ वा स्वातंत्र्य दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.
    या कार्यक्रमाचे उद्घाटन मुख्याध्यापक आनंद रामटेके यांच्या हस्ते ध्वजारोहण करून करण्यात आले.कार्यक्रमाला शालेय समितीचे अध्यक्ष, सदस्य,शिक्षक-शिक्षकेत्तर कर्मचारी,पालक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
    यानंतर विद्यार्थ्यांची भव्य रॅली ग्रामपंचायत कार्यालय पटांगणापर्यंत काढण्यात आली. पटांगणात विद्यार्थ्यांनी आकर्षक कवायत, देशभक्तीपर गीतांवर नृत्य सादरीकरण करून उपस्थितांचे मन जिंकले.
    कार्यक्रमानिमित्त सरपंच सुनिल जाधव यांच्या हस्ते बक्षीस वितरण पार पडले.यावेळी जि.प. प्रशालेचे मुख्याध्यापक,कर्मचारी,गावकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.कार्यक्रमाच्या सांगता प्रसंगी विद्यालयाच्या प्रांगणात विद्यार्थ्यांना खाऊ वाटप करण्यात आले.

  • या वेळी सहशिक्षक नामदेव अंनत्रे,शशिकांत मांजरे,संघपाल सोनकांबळे,सहशिक्षिका निर्मला वाघमारे,सुजितकुमार जाधव,बबन यादव आदी मान्यवर उपस्थित होते.
error: Content is protected !!