February 8, 2026

“कर्तव्यदक्षता आणि शिस्त हीच संस्थेची ताकद” – डॉ.अशोकराव मोहेकर

  • आष्टा – “संस्थेच्या प्रत्येक घटकाने आपल्या कर्तव्याबाबत सजग आणि प्रामाणिक राहिले पाहिजे. शाळेची गुणवत्ता ही शिक्षकांच्या मेहनतीवर,शिस्तीवर आणि जबाबदारीवर अवलंबून असते. कुणीही आपल्या कामात कुचराई करू नये;अन्यथा त्याचे परिणाम गंभीर असतील.कर्तव्यदक्षता आणि शिस्त हीच संस्थेची खरी ताकद आहे,”असे प्रतिपादन संस्थेचे कर्तव्यदक्ष सचिव डॉ.अशोकराव मोहेकर यांनी केले.

  • ज्ञानप्रसारक मंडळ येरमाळा संचलित विद्यामंदिर हायस्कूल,आष्टा ता.भूम जि.धाराशिव येथे दिनांक १२ ऑगस्ट २०२५ रोजी संस्थेचे कर्तव्यदक्ष सचिव डॉ.अशोकराव मोहेकर यांनी सदिच्छा भेट देत शाळेचा आढावा घेतला.
    बैठक सुरू करण्यापूर्वी संस्थेचे संस्थापक शिक्षण महर्षी कै.ज्ञानदेव मोहेकर गुरुजी (आण्णा) आणि कै.सुमनबाई (आईसाहेब) मोहेकर यांच्या प्रतिमेस डॉ. मोहेकर यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून पूजन करण्यात आले.

  • यानंतर शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांसोबत बैठक घेऊन डॉ.मोहेकर यांनी मार्गदर्शन केले.
    डॉ.अशोक मोहेकर यांनी नुकताच दोन महिन्यांचा अमेरिका अभ्यास दौरा यशस्वी केला असून,त्या दौऱ्यात विविध शैक्षणिक व संशोधन केंद्रांना दिलेल्या भेटींचे अनुभव त्यांनी यावेळी सर्वांसमोर मांडले.
    कार्यक्रमादरम्यान विद्यालयाचे मुख्याध्यापक आनंद रामटेके व कनिष्ठ लिपिक सुजीतकुमार जाधव यांनी डॉ.मोहेकर यांचा शाल,श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला.

  • या वेळी सहशिक्षक नामदेव अंनत्रे, शशिकांत मांजरे,संघपाल सोनकांबळे,सहशिक्षिका श्रीमती निर्मला वाघमारे,सुजीतकुमार जाधव,बबन यादव आदी शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.

 

error: Content is protected !!