February 9, 2026

ध्येय,शिस्त आणि परिश्रम हेच यशाचे सूत्र – प्राचार्य अविनाश मोरे

  • मोहा – “ध्येयापर्यंत पोहोचताना अनेक अडथळे येतात,परंतु त्यावर मात करण्यासाठी चिकाटी, परिश्रम,शिस्त आणि आत्मविश्वास या गुणांची गरज असते.ग्रामीण भागातील विद्यार्थी जर मन लावून अभ्यास करतील तर ते नक्कीच यशाच्या शिखरावर पोहोचू शकतात.शिक्षकांनी विद्यार्थ्यांच्या सुप्त गुणांना वाव दिला पाहिजे, कारण तेच गुण त्यांच्या भविष्यातील यशाचा पाया ठरतात,”असे प्रेरणादायी प्रतिपादन प्राचार्य अविनाश मोरे यांनी केले.
    ज्ञान प्रसारक मंडळ येरमाळाचे कर्तव्यदक्ष सचिव डॉ.अशोकराव मोहेकर यांच्या प्रेरणेने व प्राचार्य अविनाश मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली ज्ञान प्रसार माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय,मोहा येथे दिनांक १२ ऑगस्ट २०२५ रोजी अकरावीच्या विद्यार्थ्यांचे स्वागत सोहळा उत्साहात पार पडला.
    याप्रसंगी संस्थेचे ज्येष्ठ संचालक तात्यासाहेब पाटील,प्रशासकीय अधिकारी रमेश (भाऊ) मोहेकर, पर्यवेक्षक सतीश कानगुडे तसेच उच्च माध्यमिक विभागाचे पर्यवेक्षक प्रा.सुनील साबळे यांची प्रमुख उपस्थिती होती.
    कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा. चंद्रशेखर गिरी यांनी केले. मान्यवरांच्या हस्ते अकरावीच्या विद्यार्थ्यांचे गुलाबपुष्प देऊन स्वागत करण्यात आले.विद्यार्थिनी अंजली कोष्टी,प्रगती जाधव, अंकिता झोरी,हर्षदा एडके व जय रणदिवे यांनी आपले मनोगत व्यक्त करून स्वागताला उत्तर दिले. प्रा.सुनील साबळे यांनीही मार्गदर्शनपर विचार मांडले.
    कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विद्यार्थिनी जीनत शेख हिने केले तर आभारप्रदर्शन प्रा.देवदत्त पाटील यांनी केले.कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्रा.श्रीमती प्रतिभा सावंत,प्रा.नवनाथ करंजकर,प्रा. राहुल भिसे,प्रा.अमित जाधव,प्रा. विठ्ठल जाधव,प्रा.रोहित मोहेकर, प्रा.दिग्विजय पाटील आदींनी परिश्रम घेतले.
    या कार्यक्रमास सर्व विद्यार्थी, शिक्षक-शिक्षिका व शिक्षकेतर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
error: Content is protected !!