कळंब ( सतीश टोणगे) –नगर परिषदमधील स्वच्छता विभागाला पहाटे नगराध्यक्ष सुनंदा कापसे यांनी अचानक भेट देऊन शहरातील स्वच्छतेचा आढावा घेतला.यावेळी शहरातील अनेक ठिकाणी भेटी देऊन,स्वच्छता कर्मचारी यांना कडक सूचना दिल्या.नागरिकांनी घरातील कचरा घंटा गाडीत च टाकावा,व गाडी न आल्यास तसे कळवावे असे आवाहन ही त्यांनी केले.अचानक पहाटे भेट दिल्याने काम न करणाऱ्या स्वच्छता विभागाची भंबेरी उडाली. शहर स्वच्छ ठेवणे ही जशी नगर परिषद प्रशासनाची जबाबदारी आहे,तितकीच ती प्रत्येक नागरिकांचीही आहे.कचरा उघड्यावर न टाकता कचराकुंडीत साठवून तो घंटा गाडीतच द्यावा.ज्या भागात घंटागाडी वेळेवर येत नाही किंवा येतच नाही,त्याबाबत संबंधित विभाग, स्थानिक नगरसेवक किंवा नगराध्यक्षांना त्वरित कळवावे.कचऱ्याच्या वाढत्या समस्येचा विचार करून आगामी काळात घंटा गाड्यांची संख्या वाढवण्यासाठी आम्ही सकारात्मक पावले उचलत आहोत.शहरातील व्यापाऱ्यांनी आपल्या दुकानातील कचरा कचराकुंडीत साठवून तो घंटा गाडीतच टाकावा.बाजार परिसरात ठराविक वेळेत घंटा गाडी पाठवण्याची व्यवस्था करण्यात येत आहे.शहरात काही ठिकाणी उघड्यावर टाकलेला कचरा आढळून आला,अशा प्रकारामुळे शहरात अस्वच्छता वाढते ही बाब सर्वांनी गांभीयाने घ्यावी.स्वच्छते संदर्भात काही अडचणी असल्यास किंवा घंटा गाडी वेळेवर येत नसल्यास स्वच्छता निरीक्षक असद खतीब (मो.9730598584) यांच्याकडे तक्रार नोंदवून पाठपुरावा करावा,जेणेकरून संबंधित भागातील स्वच्छतेची कामे वेळेत पूर्ण होतील.उघड्यावर कचरा टाकणाऱ्या व्यापाऱ्यांनी तात्काळ दुकानासमोर कचराकुंडी ठेवून कचरा योग्य पद्धतीने जमा करावा. अन्यथा,पुढील काळात नाईलाजास्तव दंडात्मक कारवाई करण्यात येईल,असा इशारा देत आपले शहर सुंदर आणि स्वच्छ ठेवण्यासाठी सर्वांनी मिळून सहकार्य करावे,असे आवाहन केले.यावेळी त्यांनी कागदावर किती कर्मचारी व प्रत्यक्षात किती कर्मचारी याचा आढावा घेऊन,संबंधित अधिकाऱ्याची कानउघडणी केल्याचे समजते.सध्या शहरातील मुख्य रस्ते साफ केले जात असून,प्रभागातील कचरा,नाल्याची साफ सफाई करण्यात येत नसल्याच्या तक्रारी सोशल मीडियावर येत आहेत.या अनुषंगाने सौ.सुनंदा कापसे यांनी अचानक भेट देऊन पाहणी केली.
More Stories
तथागत बुद्ध विहार येथे रमाई जयंती उत्साहात साजरी
कल्पनानगर येथे माता रमाई जयंती उत्साहात साजरी
भीमनगरात माता रमाई जयंती उत्साहात;निळ्या ध्वजाचे ध्वजारोहण व शहरातून भव्य मिरवणूक