March 26, 2026

निवडणुकीत ७ लक्ष ४७ हजार ३७० मतदारांनी बजावला मतदानाचा हक्क

  • * सर्वाधिक मतदान भूम तालुक्यात
    * सर्वात कमी मतदान लोहारा तालुक्यात
  • धाराशिव (जिमाका)–जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी ७ फेब्रुवारी रोजी सकाळी ७.३० ते सायंकाळी ५.३० वाजता दरम्यान मतदान झाले.सायंकाळी ५.३० वाजता नंतरही काही मतदान केंद्रात प्रवेश मिळालेले मतदार मतदानासाठी रांगेत उभे होते. जिल्ह्यातील ५५ जिल्हा परिषद गट आणि ११० निर्वाचक गण अर्थात पंचायत समिती गणासाठी १३०८ मतदान केंद्रावर मतदान झाले.या निवडणुकीसाठी ११ लक्ष ४५ हजार ८८८ मतदार होते.यामध्ये ६ लक्ष ५ हजार ८४३ पुरुष,५ लक्ष ४० हजार ३७ स्त्री आणि ८ तृतीयपंथी मतदारांचा समावेश होता.
    ७ फेब्रुवारी २०२६ रोजी मतदानाच्या दिवशी ३ लक्ष ९९ हजार ६४९ पुरुष,३ लक्ष ४७ हजार ७१८ स्त्री आणि ४ तृतीयपंथी अशा एकूण ७ लक्ष ४३ हजार ३७० मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला.मतदानाची ही टक्केवारी ६५.२२ टक्के इतकी आहे.सर्वाधिक मतदान या निवडणुकीत भूम तालुक्यात झाले असून मतदानाची तेथील टक्केवारी ७१.६६टक्के इतकी आहे.सर्वात कमी मतदान लोहारा तालुक्यात ५७.३२टक्के झाले.
    भूम तालुक्यातील पाच जि.प.गट आणि दहा निर्वाचक गणासाठी ३९ हजार २३४ पुरुष व ३३ हजार ९५६ स्त्री अशा एकूण ७३ हजार १९० मतदारांनी मतदान केले.या मतदानाची टक्केवारी ७१.६६ टक्के आहे.वाशी तालुका – तीन जि.प.गट व सहा निर्वाचक गणासाठी २४ हजार ७७१ पुरुष,२१ हजार ५९४ स्त्री व दोन तृतीयपंथी अशा एकूण ४६ हजार ३६७ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. मतदानाची टक्केवारी ६९.६० टक्के आहे.
    कळंब तालुका – ८ जि.प.गट व १६ निर्वाचक गणासाठी ५८ हजार २६३ पुरुष, ५० हजार ४४९ स्त्री.एकूण १ लक्ष ८ हजार ७१२ मतदारांनी मतदान केले.मतदानाची टक्केवारी ६६.६९ टक्के इतकी आहे.धाराशिव तालुका – बारा जि.प.गट व २४ निर्वाचक गणासाठी ८५ हजार ६५० पुरुष व ७३ हजार ६०८ स्त्री अशा एकूण १ लक्ष ५९ हजार २५८ मतदारांनी मतदान केले.या मतदानाची टक्केवारी ६३.७३ टक्के इतकी आहे.
    परंडा तालुका – पाच जि.प. गट व दहा निर्वाचक गणासाठी ४१ हजार ६१५ पुरुष, ३५ हजार १९७ स्त्री अशा एकूण ७६ हजार ८१२ मतदारांनी मतदान केले. मतदानाची टक्केवारी ७१.६२ टक्के इतकी आहे.तुळजापूर तालुका – ९ जि.प गट व १८ निर्वाचक गडासाठी ६७ हजार ३४० पुरुष व ५८ हजार ७९७ स्त्री मतदार अशा एकूण १ लक्ष २६ हजार १३७ मतदारांनी मतदान केले. टक्केवारी ६४.७२ टक्के आहे.
    लोहारा तालुक्यातील ४ जि.प गट आणि ८ पंचायत समिती गणासाठी २७ हजार २१७ पुरुष व २४ हजार २२ स्त्री अशा एकूण ५१ हजार २३९ मतदारांनी मतदान केले. मतदानाची ही टक्केवारी ५७.३२ टक्के आहे. उमरगा तालुका – ९ जि.प.गट आणि १८ पंचायत समिती गणासाठी ५५ हजार ५५९ पुरुष,५० हजार ९४ स्त्री व दोन तृतीयपंथी व्यक्तींनी मतदान केले.एकूण १ लक्ष ५ हजार ६५५ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला.मतदानाची टक्केवारी ६१.१८ टक्के इतकी आहे .
error: Content is protected !!