पिंपळगाव (डोळा ) – ( राजेंद्र बारगुले यांजकडून ) कळंब तालुक्यातील पिंपळगाव (डोळा) येथील विस्तार वाढीतील जागेवर नवीन घरकुलांच्या वंचित लाभार्थ्यासाठी सर्वे करून घ्यावा अशा संबंधीतास सूचना देत पंतप्रधान व रमाई आवास योजनेतील नवीन ३१ घरकुले कामाची मुख्य कार्यकारी अधिकारी मैंनाक घोष यांनी दिनांक ३१ जुलै २०२५ रोजी पाहणी करून समाधान व्यक्त केले. मैनाक घोष यांच्या हस्ते नवीन तीन घरकुलांचे पाया भरणीचे उद्घाटन करत जीओ टॅगींग करून लाभार्थ्यांच्या खात्यावर पहिला हप्ता सोडण्यात आला. काँग्रेस आयचे जिल्हा उपाध्यक्ष भागवतराव धस यांच्या तीस वर्षाच्या न्यायालयीन लढ्यास यश येऊन एक हेक्टर जमिनीवर ३१ घरकुलाचे काम प्रगतीपथावर असल्याने मैनाक घोष यांनी समाधान व्यक्त केले. या प्रसंगी ग्रामपंचायतच्या वतीने झाडाचे रोपटे,शाल,पुष्पगुच्छ देऊन सरपंच सौ.संगीता स्वामी, उपसरपंच उमेश धस यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. याप्रसंगी महाराष्ट्र राज्य मार्केटिंग फेडरेशनचे संचालक तथा काँग्रेस आयचे जिल्हा उपाध्यक्ष भागवतराव धस,ग्राम विकास अधिकारी डी.एस.शिंदे,अभियंता तेजस पवार,अभिजीत टेकाळे,कार्यक्रम जिल्हा अधिकारी मेघराज पवार,विस्तार अधिकारी हनुमंत झांबरे,विस्तार अधिकारी दत्तात्रय साळुंके,रोजगार सेवक सौदागर जगताप व घरकुल लाभार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
More Stories
भारतीय संस्कृतीचा अभिमान बाळगावा – ह.भ.प. बाळासाहेब बोधले महाराज
भगवंताचे गुण संतांमध्ये दिसतात – ह.भ.प.अच्युत आंबीरकर महाराज
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त पिंपळगाव डोळा येथील मंदिरास भेट