August 8, 2025

मोहेकर महाविद्यालयात प्रेमचंद जयंती साजरी

  • कळंब- ज्ञान प्रसारक मंडळ येरमाळाचे सचिव डॉ.अशोकराव मोहेकर यांच्या प्रेरणेने प्राचार्य डॉ.हेमंत भगवान यांच्या मार्गदर्शनाखाली शिक्षण महर्षी ज्ञानदेव मोहेकर महाविद्यालय कळंब येथे
    दि.३१ जुलै २०२५ रोजी साहित्य जगातील सर्वोच्च पुरुष,आदर्शवादी वास्तववादी लेखनाचे मसीहा,लेखणीचे सैनिक मुन्शी प्रेमचंद जी यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.
    याप्रसंगी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.हेमंत भगवान,उपप्राचार्य अप्पासाहेब मिटकरी,हिंदी विभाग प्रमुख डॉ.दत्ता साकोळे,मारुती शिंपले,बालाजी बाबर,डॉ. ईश्वर राठोड, डॉ. अर्चना मुखेडकर, डॉ.मीनाक्षी जाधव,प्रा.शाहरुख शेख, शिक्षक,विद्यार्थी आदी उपस्थित होते.
error: Content is protected !!