August 8, 2025

व्यावसायिक समाजकार्य अभ्यासक्रमातून जीवन जगण्याचे सामर्थ्य मिळते – डॉ.सागर कोंडेकर

  • लातूर – सध्या पदवी आणि पदव्युत्तर शिक्षणाचे विविध अभ्यासक्रम विविध विद्यापीठामार्फत राबविले जातात यामध्ये व्यावसायिक समाजकार्याचा अभ्यासक्रम हा विद्यार्थ्यांच्या जीवनाला कलाटणी देणारा अभ्यासक्रम असून त्यामुळे विद्यार्थ्यांना जीवन जगण्याचे सामर्थ्य प्राप्त होते असे प्रतिपादन सामाजिक शास्त्रे संकुल,स्वा.रा. ती.म.नांदेड,उपपरिसर लातूरचे संचालक डॉ.सागर कोंडेकर यांनी केले.
    महात्मा बसवेश्वर शिक्षण संस्था, लातूर द्वारा संचलित महात्मा बसवेश्वर महाविद्यालयातील समाजकार्य मंडळ उद्घाटन समारंभा ते उद्घाटक म्हणून बोलत होते.
    या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.संजय गवई,प्रमुख अतिथी माजी विद्यार्थी अँड.फुलचंद कावळे, समाजकार्य विभाग प्रमुख डॉ.दिनेश मौने, प्रा. काशिनाथ पवार,डॉ.दत्ता करंडे, प्रा.आशीष स्वामी, प्रा.भाग्यश्री भुजबळ यांची उपस्थिती होती.
    कार्यक्रमाच्या प्रारंभी जगतज्योती महात्मा बसवेश्वर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून दीप प्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात झाली.
    यावेळी मोरे वैष्णवी आणि गरुड पार्वती या विद्यार्थिनींनी स्वागत गीत सादर केले.
    पुढे बोलताना डॉ.सागर कोंडेकर म्हणाले की,व्यावसायिक समाजकार्याचा अभ्यासक्रम आजच्या वर्तमान काळामध्ये रोजगाराभिमुख असून त्यामधून जीवन जगण्याचे कौशल्य प्राप्त होते हा अभ्यासक्रम पूर्ण केल्यानंतर विद्यार्थ्यांना सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग, महिला व बालविकास विभाग, औद्योगिक क्षेत्र,महिला बाल व युवक कल्याण विभाग आणि समुपदेशन विभागामध्ये रोजगार सुद्धा उपलब्ध होऊन स्वयंसेवी संस्था सुद्धा निर्माण करून इतरांना रोजगार उपलब्ध करून देता येतो असेही ते यावेळी म्हणाले.
    यावेळी बोलताना अँड.फुलचंद कावळे म्हणाले की,मी समाजकार्य विभागाच्या माजी विद्यार्थी असून या अभ्यासक्रमामुळे माझ्या जीवनात सकारात्मक अमुलाग्र बदल घडून आले आज मी न्यायालयामध्ये वकील म्हणून उत्कृष्ट प्रॅक्टिस करीत आहे. आपण विद्यार्थ्यांनी नियमित वर्ग करणे,क्षेत्रकार्याला जाणे, अहवाल लिखाण करणे आणि प्रबंध अहवालाचे शास्त्रीय दृष्टिकोनातून संशोधन करणे या सोबत विविध सामाजिक उपक्रमांमध्ये सहभागी होऊन आपले व्यक्तिमत्व प्रगल्भ बनविले पाहिजे असे ते म्हणाले.
    या कार्यक्रमांमध्ये समाजकार्य मंडळाचे पदसिद्ध अध्यक्ष म्हणून डॉ.संजय गवई,सचिव शुभांगी राठोड,सहसचिव मंथन राठोड, कोषाध्यक्ष रितूल नटवे,सदस्य अजय गुंढे,ढोबळे रूपाली,गर्जे अंजली,चव्हाण विद्यानंद, कोळी प्रज्वल आणि गोरे रूपाली या सर्व समाजकार्य मंडळ पदाधिकाऱ्यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात येऊन शैक्षणिक वर्ष २०२५-२६मध्ये करावयाच्या विविध कार्याची माहिती सर्वांनी त्यांना करून दिली.
    या कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. दिनेश मौने यांनी केले, मनोगतपर मार्गदर्शन प्रा.काशिनाथ पवार यांनी केले तर अध्यक्षीय समारोप प्राचार्य डॉ. संजय गवई यांनी केला
    या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रूपाली ठोंबरे आणि शुभांगी राठोड यांनी केले, आभार गर्जे अंजली हिने आभार मानले.
    या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी नंदू काजापुरे, बालाजी डावकरे, प्रा. शंकर भोसले, प्रा. मारुती माळी यांनी परिश्रम घेतले.
    या कार्यक्रमाला समाजकार्य विभागातील प्रथम, द्वितीय व तृतीय वर्षाची विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. शेवटी राष्ट्रगीताने या कार्यक्रमाची सांगता झाली.
error: Content is protected !!