August 8, 2025

लसाकम शाखा कळंबतर्फे डॉ.संपदा रणदिवे यांचा सन्मानपूर्वक सत्कार

  • कळंब – लसाकम शाखा कळंबच्या वतीने समता नगर येथील रहिवासी अशोक रणदिवे व सौ. चित्रलेखा रणदिवे यांची कन्या कु.डॉ.संपदा अशोक रणदिवे हिने महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ, नाशिक अंतर्गत शासकीय आयुर्वेद महाविद्यालय, नांदेड येथून बीएएमएस (BAMS) ही वैद्यकीय पदवी यशस्वीरीत्या पूर्ण केली. या यशाबद्दल तिचा सन्मानपूर्वक सत्कार करण्यात आला.
    लसाकमचे कार्याध्यक्ष मा.बापू भंडारे, तालुका अध्यक्ष दिलीप मोरे, सचिव दत्ता गायकवाड, कोषाध्यक्ष सोमनाथ कसबे, तसेच प्रसिद्धी प्रमुख बाळासाहेब कांबळे यांच्या हस्ते दि.२९ जुलै २०२५ रोजी डॉ.संपदा रणदिवे यांचा सत्कार करण्यात आला.तिच्या या यशामुळे कळंब तालुक्याचा गौरव झाला असून समाजातील इतर विद्यार्थ्यांसाठी ती प्रेरणास्थान ठरली आहे.
    यावेळी लसाकमच्या पदाधिकाऱ्यांनी तिचे पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
error: Content is protected !!