August 8, 2025

सर्प समज व गैरसमज बाबत मार्गदर्शन कार्यक्रम उत्साहात संपन्न

  • कळंब – नागपंचमीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती,धाराशिव जिल्हा व शहर शाखा कळंब यांच्या संयुक्त विद्यमाने
    दि.२९ जुलै २०२५ रोजी मॉडेल इंग्लिश स्कूल कळंब व विद्याभवन हायस्कूल कळंब येथे
    विद्यार्थ्यांसाठी “सर्प:समज व गैरसमज” या विषयावर प्रबोधनपर मार्गदर्शन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.
    या उपक्रमामध्ये विद्यार्थ्यांना सर्पांविषयी शास्त्रीय माहिती व जागृतीपर प्रशिक्षण देण्यात आले. कार्यक्रमात विषारी व बिनविषारी साप यांच्यातील फरक, सापांबद्दलचे गैरसमज व अंधश्रद्धा, सर्पदंश झाल्यास योग्य प्राथमिक उपचार व प्रथमोपचार पद्धती यांचे सखोल मार्गदर्शन करण्यात आले.तसेच सापांच्या संवर्धनातील महत्त्व व पर्यावरणीय दृष्टिकोनातून त्यांचे स्थान यावरही प्रकाश टाकण्यात आला.
    कार्यक्रमात प्रात्यक्षिके,चित्र व बॅनर माध्यमातून विद्यार्थ्यांना सर्पांबद्दल योग्य ज्ञान मिळविण्याची प्रमुख मार्गदर्शक म्हणून सर्पमित्र प्रकाशन विभागाचे राज्य कार्यवाह तुकाराम शिंदे यांनी बहुमूल्य मार्गदर्शन केले.
    तसेच अरविंद शिंदे (जिल्हा कार्याध्यक्ष,महा.अं.नि.स. धाराशिव ),बालाजी राऊत (जिल्हा प्रधान सचिव ),डॉ.संजय सावंत यांचीही विशेष उपस्थिती लाभली.
    कार्यक्रमाचे आयोजन व समन्वय मॉडेल इंग्रजी स्कूल चे मुख्याध्यापक येंदे व विद्याभवन हायस्कूलचे मुख्याध्यापक व्ही.जी. कुंभार यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले.

  • या कार्यक्रमास सुमारे ३०० पेक्षा जास्त विद्यार्थी,शिक्षक , शिक्षकेत्तर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थिती होते.विद्यार्थ्यांनी कार्यक्रमात उत्स्फूर्त सहभाग घेत सर्पांविषयीच्या अंधश्रद्धा दूर करून वैज्ञानिक दृष्टिकोनातून विचार करण्याचा संकल्प केला.
error: Content is protected !!