दिनांक २८- ७- २०२५ वार सोमवार रोजी माझी आई वच्छलाबाई दत्तात्रय पाटील हिचे आंबेजोगाई येथील शासकीय रुग्णालयात संध्याकाळी सहा वाजता दुःखद निधन झाले. अत्यंत गरीब परिस्थितीत तिने आम्हास लहानाचे मोठे केले. माझ्यावर चांगले संस्कार केले.शिक्षण हे वाघिणीची दूध आहे हे तिने मला शिकवले.शिकल्याशिवाय आपल्याला पर्याय नाही.हे तिने वारंवार मनावर बिंबवले म्हणूनच घरची परिस्थिती हलाखीची असताना मी शिकावे हा अट्टाहास कायम ठेवला.मी शिकलो शिक्षक म्हणून रुजू झालो हे तिचेच फलश्रुत.स्वभावाने अत्यंत प्रेमळ साधी,थोडीशी भोळसर मनमिळावू स्वभावाची असलेली आई आमच्या जीवनाला दिशा देऊन अनंतात विलीन झाली.बालपणी बार्शीला शिक्षण घेत असताना पहाटे पाच वाजता उठून जेवणाचा डब्बा तयार करुन द्यायची .मी तर म्हणेल तिने रोज प्रेमाने दिलेला डब्बा आयुष्याची शिदोरी देऊन गेला.नाहीतर खाणावळीचा डब्बा खरेदी करण्याचीही ऐपत नव्हती.
श्री.संजय जगताप
माझी आई आंदोरा गावाच्या बाबुराव (अण्णा) तांबारे या बड्या जमीनदाराची एकुलती एक लेक.चार भावात एकटीच..माझ्या अण्णाची लाडकी ”वचाबाई’ल पण माहेरी श्रीमंती असून नंतर सासरी एकत्रित कुटुंबपध्तीत वाटणीत झालेली ससेहोलपटीमुळे आलेल्या दारिद्र्यवर शिक्षणातून मात देण्याच बाळकडू आम्हास तिन दिल.अन् पांडुरंगाच्या कृपाआशीर्वादाने नोकरी लागली व परिस्थितीताला बाळस आलं.तिच्यामुळे जीवनाच सोन झाल.वर्षं 80 प्रकृतीनी अत्यंत अशक्त असणाऱ्या आईच मागील 10 दिवसात सुरू झालेल्या पोटदुखीने काळ अंधकाराकडे ओढावला.सुरुवातीला साधारण वाटणार दुखण तिला मृत्यूच्या दारात उभा करेल अशी पुसटशीही कल्पना मनाला स्पर्श करूनही गेली नाही.डाॅ.बावळे सरांच्या दवाखान्यातून दि १८ जुलै रोजी डाॅ.बकरे सर बार्शी येथे हलवण्यात आले.त्या दिवशी आई कळंब येथील घरातून निघून गेली ती कायमचीच…मरण कळून येत म्हणतात म्हणूनच की काय एकांतात खूप काही बोलून गेली.तिने माझा संघर्ष डोळ्याने अनुभवला म्हणूनच कौतुकाची थाप पाटीवर मारली.एक वेळ जेवणाची भ्रांत अनुभवलेल्या तिला माझ थोडफार कमावण तिच्या मनाला भावायच.म्हणून त्या दिवशी म्हणाली”तु खूप काही केल.आता निवांत रहा.शरीराची काळजी घे.”मुलाच्या लग्नाबद्दलही विचारपूस केली.नंतर बार्शी येथे अॅडमिट केल्यानंतर मृत्यूच्या दाढेत अधिक गेली.ऑपरेशन केल्यानंतर वजन कमी व वय जास्त असल्या कारणास्तव शरीराने तिला अजिबात साथ दिली नाही व प्रकृती चिंताजनक होत गेली.नंतर अंबाजोगाई येथील शासकीय रुग्णालयात हलविण्यात आले.तेथेही शरीराचा गुंता अधिक वाढला अन् तिची प्राणज्योत मालवली.वडिलांच्या निधनानंतर अवघ्या वर्षांतच परत आम्हास परत परक करुन गेली.मला तर असे वाटते तिचा संघर्षच जीवनाला आधार देऊन गेला म्हणूनच की काय कळंब येथील छोटेखानी घरावर ‘वत्सला’ नाव टाकण्याची संकल्पना न कळत मनात आली व परमेश्वराच्या कृपाशीर्वादाने साकार झाली.तु दिलेल्या पाठबळाबद्द्ल मी सदैव तुझा ऋणी असेल…सरळ मायाळू स्वभावाच्या व्यक्तीस वैकुंठगमन मिळते अन मला खात्री आहे तु ते प्राप्त केलेस या जीवनपटाच्या रंगमंचावर..
More Stories
संचालिका सौ.अंजली मोहेकर यांची विद्याभवन प्राथमिक विद्यामंदिरास सदिच्छा भेट
मोहेकर महाविद्यालयात ग्रंथालय शास्त्राच्या राष्ट्रीय चर्चासत्राचे आयोजन
भीमराव दादा सत्यवचनी व्यक्तिमत्व होतं – डॉ. माणिक डिकले