नांदेड (अंकुश पोवाडे) – कळंब शहरातील समता नगर येथील रहिवासी आणि सा.साक्षी पावनज्योतचे वाचक अशोक रणदिवे यांची सुकन्या संपदा अशोक रणदिवे हिने महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ,नाशिक अंतर्गत शासकीय आयुर्वेदिक महाविद्यालय,नांदेड येथून बीएएमएस (BAMS) ही प्रतिष्ठेची वैद्यकीय पदवी यशस्वीरित्या संपादन केली आहे. विशेष समारंभात नांदेड जिल्हाधिकारी राहुल कार्डिले, कमिशनर डॉ.महेश डोईफोडे आणि विद्यापीठ प्रमुख डॉ. वाय.आर.पाटील यांच्या हस्ते डॉ.संपदा यांना पदवी प्रदान करण्यात आली.हा क्षण तिच्या कुटुंबियांसाठी गौरवाचा ठरला.
या प्रसंगी डॉ.अनन्या रेड्डी,तिचे वडील अशोक रणदिवे,आई चित्रलेखा रणदिवे,भाऊ रत्नदीप व अमरदीप रणदिवे यांच्यासह कुटुंबातील सदस्य उपस्थित होते.शैक्षणिक वाटचालीत डॉ.शिल्पा इंगळे,डॉ.उज्वला पवार,डॉ.विद्या डोळे आणि डॉ.सावई यांचे मार्गदर्शन लाभले. या यशाबद्दल साक्षी पावनज्योतच्या शिक्षण महर्षी ज्ञानदेव मोहेकर गुरुजी जन्मोत्सव विशेषांकाचे कार्यकारी संपादक अविनाश घोडके यांच्या हस्ते डॉ. संपदा रणदिवे यांना सन्मानपत्र देऊन भावी वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या.
More Stories
सक्षम ताटे हत्येतील ‘खाकी’वरही संशय! कारवाईच्या मागणीसाठी आचल ताटे व आईचा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आत्मदहन प्रयत्न
प्रवीण बागडे यांना ‘प्रबुद्ध साहित्यरत्न’ पुरस्कार – समाजाभिमुख लेखणीचा गौरव
नांदेड- मुंबई ‘वंदे भारत एक्सप्रेस’ ने उघडले मराठवाड्याच्या समृद्धीचे द्वार – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस