डिकसळ – राज्य शासनाच्या अल्पसंख्याक बहुल ग्रामीण भागातील पायाभूत सुविधा विकास योजनेअंतर्गत सन २०२४-२५ मध्ये मंजूर करण्यात आलेल्या ₹७० लाख निधीचा वापर करून मौजे डिकसळ (इस्लामपुरा) परिसरात महत्त्वाची विकासकामे पूर्णत्वास नेण्यात आली आहेत. या सर्व विकासकामांची प्रेरणा व पुढाकार शिवसेनेचे नेते अजित (दादा ) पिंगळे यांच्या प्रयत्नातून घेण्यात आली असून,शिवसेना तालुका प्रमुख लक्ष्मीकांत हुलजुते आणि डिकसळचे माजी सरपंच अमजद मुल्ला यांच्या मार्गदर्शनाखाली याची अंमलबजावणी करण्यात आली. पूर्ण झालेली विकासकामे पुढीलप्रमाणे – रफीक शेख यांचे घर ते वहाब मनियार यांचे घरापर्यंत सिमेंट काँक्रिट रस्ता – ₹10 लाख,मोहम्मदीया मस्जिद ते अस्सलम तांबोळी यांच्या घरापर्यंत सिमेंट काँक्रिट रस्ता – ₹10 लाख,इम्रान शेख यांचे घर ते नसीर मोमीन यांच्या घरापर्यंत सिमेंट काँक्रिट रस्ता – ₹10 लाख,युसुब सय्यद यांचे घर ते अमजद मिर्जा यांच्या घरापर्यंत सिमेंट काँक्रिट रस्ता – ₹10 लाख,मौजे डिकसळ मुस्लिम कब्रस्तान अंतर्गत सिमेंट काँक्रिट रस्ता – ₹10 लाख, मुस्लिम कब्रस्तान अंतर्गत संरक्षण भिंत बांधणे – ₹10 लाख,मक्का मस्जिद जवळ पावर ब्लॉक उभारणी – ₹10 लाख एकूण मंजूर व पूर्ण निधी – ₹ ७० लाख या कामांमुळे इस्लामपुरा भागात दळणवळण,सार्वजनिक आरोग्य, धार्मिक स्थळांपर्यंतचा प्रवेश, आणि सुरक्षिततेसंबंधी सुविधा मोठ्या प्रमाणात सुधारल्या आहेत. स्थानिक रहिवाशांनी या कामांचे स्वागत करत शिवसेनेच्या नेतृत्वाचे विशेष आभार मानले आहेत. शिवसेना पक्षाचे लोकाभिमुख आणि विकासाभिमुख कार्य यामध्ये स्पष्टपणे दिसून येत आहे, असे ग्रामस्थांनी नमूद केले.
** या विकास कामांबाबत डिकसळ ग्रामपंचायतीचे सदस्य इम्रान मुल्ला,मोबीन मनियार व सौ. इर्शाद रफीक सय्यद यांनी समाधान व्यक्त करताना सांगितले की,या भागातील दीर्घकाळ प्रलंबित असलेल्या पायाभूत सुविधांच्या कामांना गती मिळाल्यामुळे नागरिकांमध्ये समाधानाचं वातावरण आहे. तसेच त्यांनी शिवसेनेचे नेते अजित (दादा) पिंगळे व त्यांच्या सहकाऱ्यांचे विशेष आभार मानले आणि म्हणाले की, “या विकास कामांसाठी सातत्याने पाठपुरावा करून निधी मंजूर करून घेण्यात त्यांचे योगदान अत्यंत मोलाचे ठरले आहे. या कामामुळे नागरिकांना दिलासा मिळणार आहे.”
More Stories
संचालिका सौ.अंजली मोहेकर यांची विद्याभवन प्राथमिक विद्यामंदिरास सदिच्छा भेट
मोहेकर महाविद्यालयात ग्रंथालय शास्त्राच्या राष्ट्रीय चर्चासत्राचे आयोजन
भीमराव दादा सत्यवचनी व्यक्तिमत्व होतं – डॉ. माणिक डिकले