August 8, 2025

चांगल्या माणसांनी एकत्र येऊन चांगलं घडविण्याचा प्रयत्न केला तर चांगलंच घडेल – आमदार सतेज पाटील

  • कोल्हापूर (माधवसिंग राजपूत ) – सध्याची भयावह परिस्थिती पाहता,माणूस माणसापासून लांब जात आहे. तंत्रज्ञानाच्या विकासामध्ये माणसांचा संवाद हरवत चालला आहे. अशा काळात चांगलं काम करणाऱ्या माणसाने एकत्र येणे गरजेचे आहे.आपला समाज सुंदर आणि मानवतावादी बनवायचा असेल तर चांगल्या माणसाने एकत्र येऊन चांगले घडविण्याचा प्रयत्न केला तर तो नक्कीच घडेल असे प्रतिपादन आमदार सतेज पाटील यांनी केले.
    ते राज्य गुणवंत कामगार असोसिएशन,महाराष्ट्र व जागृत नागरीक सेवा,महाराष्ट्र यांच्या संयुक्त विद्यमाने शाहू महाराज यांच्या १५१ व्या जयंतीचे औचित्य साधून, समाजातील सर्वच क्षेत्रात भरीव कामगिरी करणाऱ्या सामाजिक कार्यकर्त्यांना राज्य व राष्ट्रीय पुरस्कार वितरण सोहळ्यात बोलत होते.
    समाजातील सर्व घटकांच्या उन्नती व प्रगतीकरीता सातत्याने समाजाभिमुख कार्य करणाऱ्या सामाजिक कार्यकर्त्यांना, राज्यस्तरीय व राष्ट्रीय पातळीवरील विश्वकर्मा पुरस्कार मान्यवरांच्या हस्ते वितरीत करणेत आले होते.
    यावेळी सामाजिक,शैक्षणिक, साहित्यिक,सांस्कृतिक,कला – क्रिडा,आरोग्य,पत्रकारीता,उद्योग, कृषी,गायन,शासकिय व निम शासकीय सेवेत वैशिष्ठयपूर्ण कार्य तसेच समाजातील वंचित व उपेक्षित घटकांसाठी सेवाभावीवृत्तीने उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या सामाजिक कार्यकर्त्यांना राज्यस्तरीय समाज भूषण,समाजरत्न,आदर्श संपादक, आदर्श पत्रकार,आदर्श शिक्षक / शिक्षिका,कामगार भूषण,कामगार रत्न,आदर्श संस्था,सहकार भूषण, कला भूषण,कृषी रत्न,साहित्य व गायन भूषण,उद्योग भूषण,उद्योग रत्न,आदर्श योग शिक्षक / शिक्षिका असे विविध पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.
    राज्यस्तरीय वितरीत केलेले पुरस्कार पुढीलप्रमाणे –
    उत्तम हुजरे,डॉ.महादेव पोवार, दत्तात्रय शिरोडकर,विजयकुमार पोवार,प्रसन्न पारकर,लक्ष्मण पाटील,अरुण थोरात,मीना विजय साळुंखे,भरत खांडेकर,बबन कदम,सागर पाटील,अमर मोकाशी,कुलदीप जनार्दन सावंत, राजन जांभळे,तानाजी चोपडे, विनायक यादव,वृषाली विजय चव्हाण,जालंदर पाटील, बाबासाहेब हजारे,पूनम अक्षय जाधव,अरूण सुरकर,रमेश नाईक,रतन पाटील,डॉ.दत्ता ठुबे पाटोदकर,रामचंद्र काळे,राजेंद्र जाधव,प्रभाकर कांबळे,संजय तावडे,राजेंद्र कांबळे,बाळकृष्ण तावडे,के.पी.बिराजदार,प्रतिभा कांबळे,दत्तप्रसाद शिरोडकर, ह.भ.प. महादेव महाराज आडसूळ, संपत तावरे, केरबा डावरे, सखाराम जाधव, तुळशीदास सन्नके, दिपक शिंगरे, चंद्रकांत मोरे, ॲड. जयश्री प्रसाद शेळके शिंदे इत्यादी.
    राष्ट्रीय पातळीवरील वितरीत केलेले पुरस्कार पुढीलप्रमाणे –
    संजीव चिकुर्डेकर, काळुराम लांडगे, डॉ. मेघना विनय चौगुले, प्रदीप गायकी, गोविंद पाचपोर, संजय पातुरकर, रुपचंद फुलझेले, किसन नागरकर, संतोष ताजने, मारोती पिंपळशेंडे, डॉ. निमिशा नितीन मोहरीर, सुर्यकांत घाडगे, संतोष यादव, किशोर सोमवंशी, राजाराम बोत्रे, सुलभा साईदास ताकवणे, सचिन थोरात, मोहनराव जाधव, सुनिता रविंद्र परमणे, मनिषा चंद्रकांत देशमुख, धीरज देसाई, निखील साटम, रामराव तायडे, भरत सकपाळ, अरुण म्हात्रे, अनिल तावडे, प्रविण चव्हाण इत्यादी.
    यावेळी राजयोगिनी ब्रम्हाकुमारी सुनिता बहेनजी, अनिल म्हमाने-अध्यक्ष निर्मिती विचारमंच, डॉ. रविकांत पाटील-चेअरमन केंद्रीय श्रमिक बोर्ड, विशाल घोडके-सहा. कामगार आयुक्त, विजय शिंगाडे-कामगार कल्याण अधिकारी आदींनी मनोगते व्यक्त केली. कार्यक्रमाची सुरुवात मान्यवरांच्या हस्ते दिप प्रज्वलनाने करणेत आली.
    स्वागत व प्रास्ताविक संस्थेचे अध्यक्ष सुरेश केसरकर यांनी केले. सूत्रसंचालन स्वप्नील गोरंबेकर यांनी केले. तर आभार संजय सासने यांनी मानले.
    सदर पुरस्कार वितरण सोहळा यशस्वीपणे संपन्न होणेकरीता संस्थेचे अध्यक्ष सुरेश केसरकर, संजय सासने, अनिता काळे, रूपाली निकम, संभाजी थोरात, शिवाजी चौगुले, महादेव चक्के, भगवान माने, प्रभाकर कांबळे, अशोक जाधव, अच्युतराव माने, केरबा डावरे, भरत सकपाळ, देवराव कोंडेकर आदींनी विशेष परिश्रम घेतले.
error: Content is protected !!