August 9, 2025

कॅनव्हास इंटरनॅशनल स्मार्ट स्कूलमध्ये “कारगिल विजय दिवस” उत्साहात साजरा

  • कळंब – कॅनव्हास इंटरनॅशनल स्मार्ट स्कूलमध्ये दिनांक २६ जुलै २०२५ रोजी “कारगिल विजय दिवस” अभिमानपूर्वक आणि देशभक्तीपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला.या कार्यक्रमाचे आयोजन शाळेच्या हिंदी विभागामार्फत करण्यात आले होते.कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी विविध देशभक्तिपर सांस्कृतिक सादरीकरणांद्वारे भारतीय शूरवीर सैनिकांच्या बलिदानाला अभिवादन केले.
    कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून मोहेकर महाविद्यालय,कळंब येथील हिंदी विभागप्रमुख प्रा.दत्ता साकोळे यांनी उपस्थित राहून विद्यार्थ्यांचे कौतुक केले.त्यांनी आपल्या मार्गदर्शनपर भाषणात कारगिल युद्धातील भारतीय सेनेच्या शौर्याची आठवण करून दिली आणि आजच्या विद्यार्थ्यांनी देशासाठी कर्तव्यबुद्धीने सज्ज राहावे,असे आवाहन केले.
    कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान शाळेचे नवे प्राचार्य पवन कुलकर्णी सर यांनी भूषवले.त्यांनी आपल्या मनोगतातून देशभक्तीची जाणीव विद्यार्थ्यांमध्ये जागृत केली. संस्थेच्या संचालिका सौ.आशा नरहिरे यांनीही विद्यार्थ्यांना प्रेरणादायी संदेश दिला.
    कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी “कारगिल युद्ध” या विषयावर प्रभावी भाषणं सादर केली.विविध गटांनी देशभक्तिपर गीते गायली,तसेच विद्यार्थ्यांच्या नृत्य सादरीकरणांनी उपस्थितांची मने जिंकली. कार्यक्रमातून देशप्रेम,शिस्त,आणि समर्पणाची मूल्ये विद्यार्थ्यांमध्ये बिंबविण्याचा यशस्वी प्रयत्न करण्यात आला.
    या कार्यक्रमाचे यशस्वी संयोजन हिंदी विभागाच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले.कार्यक्रमाचे संचालन आणि संपूर्ण नियोजन सचिन शिंदे यांनी अत्यंत सुरळीतपणे पार पाडले. कार्यक्रमाच्या शेवटी सान्वी मांडवकर यांनी आभार प्रदर्शन करून सर्व मान्यवर,शिक्षकवृंद आणि विद्यार्थ्यांचे मनःपूर्वक आभार मानले.
    हा कार्यक्रम उपस्थित सर्वांनी अत्यंत प्रेरणादायी आणि भावनिक अनुभूती देणारा ठरल्याची प्रतिक्रिया दिली.कॅनव्हास स्कूलने अशा उपक्रमांद्वारे विद्यार्थ्यांमध्ये देशप्रेम, जबाबदारी आणि सामाजिक जाणीव निर्माण करण्याचा व्रत घेतले आहे.
error: Content is protected !!