कळंब – शिक्षण महर्षी कै. ज्ञानदेव मोहेकर गुरुजी यांच्या ९८ व्या जयंतीनिमित्त शिक्षण महर्षी ज्ञानदेव मोहेकर महाविद्यालय, कळंब येथे विद्यार्थ्यांच्या सांस्कृतिक कार्यक्रमाचे भव्य आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमात ज्ञान प्रसार माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय,मोहा येथील विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या आकर्षक गोंधळ नृत्याने उपस्थितांची मने जिंकली. कार्यक्रमाला ज्ञान प्रसारक मंडळाचे सचिव डॉ.अशोक (दादा) मोहेकर,उपाध्यक्ष डॉ.आबासाहेब बारकुल,प्रशासकीय अधिकारी रमेश (भाऊ) मोहेकर तसेच संस्थेचे सर्व संचालक उपस्थित होते. सर्व मान्यवरांनी विद्यार्थ्यांच्या कलागुणांचे मनःपूर्वक कौतुक केले. याप्रसंगी प्राचार्य अविनाश मोरे, पर्यवेक्षक डी.बी.मडके,आणि प्रा. सुनील साबळे यांच्या मार्गदर्शनाखाली सहशिक्षिका नीता सोनवणे,प्रा.प्रतिभा सावंत व उषा पांचाळ यांनी नृत्याचे दिग्दर्शन केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सहशिक्षक सतीश मडके,जनार्दन भामरे व संजय आडणे यांनी विशेष मेहनत घेतली. या सांस्कृतिक सोहळ्याला सर्व शिक्षक,शिक्षिका,शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
More Stories
संचालिका सौ.अंजली मोहेकर यांची विद्याभवन प्राथमिक विद्यामंदिरास सदिच्छा भेट
मोहेकर महाविद्यालयात ग्रंथालय शास्त्राच्या राष्ट्रीय चर्चासत्राचे आयोजन
भीमराव दादा सत्यवचनी व्यक्तिमत्व होतं – डॉ. माणिक डिकले