August 8, 2025

निकृष्ट रेशन धान्यप्रकरणी तहसीलदारांना निवेदन;सुदर्शन लोंढे यांची दोषींवर कारवाईची मागणी

  • माळकरंजा (कळंब) येथील सार्वजनिक वितरण व्यवस्थेतील गोंधळ उघड; लाभार्थ्यांच्या आरोग्याला धोका
  • कळंब- माळकरंजा येथील सार्वजनिक वितरण प्रणाली (PDS) अंतर्गत मिळणाऱ्या रेशन धान्याचा दर्जा अत्यंत निकृष्ट असून,ते आरोग्यास घातक असल्याचा गंभीर आरोप सुदर्शन एम.लोंढे (रा.माळकरंजा) यांनी करत तहसीलदार कार्यालयात लेखी निवेदन सादर केले आहे.
    निवेदनात त्यांनी स्पष्ट नमूद केले आहे की,सध्या रेशनमध्ये वितरित केले जाणारे धान्य कीड,अळ्या व मस्कीडग्रस्त असून,खाण्यायोग्य नसलेले हे धान्य ग्राहक संरक्षण कायदा,2019,अन्न सुरक्षा आणि मानक प्राधिकरण कायदा (FSSAI) तसेच राष्ट्रीय अन्न सुरक्षा कायदा,2013 यांचे उल्लंघन करते.
    लोंढे यांनी या धान्याचे फोटो व व्हिडिओ पुरावे तहसील कार्यालयाच्या अधिकृत व्हॉट्सॲप क्रमांकावर पाठवले असून, या माध्यमातून रेशन व्यवस्थेतील घोटाळा, हलगर्जीपणा आणि व्यवस्थेतील अपयश समोर येत आहे.
  • लोंढे यांच्या प्रमुख मागण्या पुढीलप्रमाणे आहेत –
    निकृष्ट रेशन धान्याची सखोल चौकशी करून दर्जेदार धान्याची तातडीने पूर्तता करावी,दोषी पुरवठादार,गोदाम प्रशासन व वितरण प्रक्रियेत दोषी आढळणाऱ्यांवर कठोर कायदेशीर कारवाई करावी,वितरण प्रक्रियेत नियमांचे पालन न झाल्यास, संबंधित प्रशासकीय अधिकाऱ्यांवरही जबाबदारी निश्चित करून दंडात्मक कारवाई व्हावी.
    “हा प्रकार संपूर्ण सार्वजनिक वितरण व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण करणारा आहे. प्रशासनाने या प्रकरणाची तातडीने दखल घ्यावी व दोषींवर कठोर कार्यवाही व्हावी,” अशी ठाम भूमिका लोंढे यांनी आपल्या निवेदनात मांडली आहे.
error: Content is protected !!