लातूर (दिलीप आदमाने) – जिजामाता माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, एमआयडीसी लातूर येथील कार्यालयीन अधीक्षक बालाजी साबळे यांची जी २४ संघटनेच्या लोकशाहीर डॉ.अण्णाभाऊ साठे जयंती उत्सव समितीच्या उपाध्यक्षपदी नुकतीच निवड झाल्याबद्दल विद्यालयात त्यांचा गौरव करण्यात आला. या प्रसंगी विद्यालयाचे प्राचार्य प्रा. देविदास कोल्हे व मुख्याध्यापिका श्रीमती सायुज्येता खंदारे यांच्या शुभहस्ते साबळे यांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. कार्यक्रमास कला विभाग प्रमुख प्रा.बाबासाहेब सोनवणे, एमसीव्हीसी विभाग प्रमुख प्रा. दत्तात्रय मुंढे,डॉ.संतोष जोहरी,प्रा. दिपक नावाडे,प्रा.प्रदीप खामगावकर,प्रा.अरविंद पदातुरे, प्रा.सुधीर बाळापुरे,सुभाष मेहेत्रे, शंकर पांचाळ,शंकर दुरुगकर, श्रीमती वर्षा येमटे,सविता राठोड, बालाजी पवार,आर्जुन कांबळे यांची उपस्थिती लाभली होती. उपस्थित मान्यवरांनी साबळे यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
More Stories
जिल्हा परिषद महिला परिचरांच्या न्यायासाठी ठिय्या आंदोलन यशस्वी!
एकशे सात सुरक्षा रक्षक झाले बेरोजगार;लातूरच्या शासकीय रुग्णालयाचा बेभरवशाचा कारभार!
जीवनाच्या परीक्षेत यशस्वी होऊन कुटुंबाचा आधार बना – आमदार विक्रम काळे