कळंब – येथील सुमित अंगद मिटकरी याने NEET (राष्ट्रीय पात्रता व प्रवेश परीक्षा) २०२५ मध्ये ५५५ गुण मिळवत देशात १००१७ वा क्रमांक (Rank) पटकावला आहे.त्यामुळे तो MBBS वैद्यकीय अभ्यासक्रमासाठी पात्र ठरला आहे. सुमित याचे शिक्षण पहिली ते दहावीपर्यंत ज्ञान प्रसारक मंडळाचे कर्तव्यदक्ष सचिव डॉ.अशोकराव मोहेकर यांच्या प्रेरणेतून कार्यरत असणाऱ्या विद्याभवन प्राथमिक व माध्यमिक हायस्कूल येथे झाले. इयत्ता दहावीत त्याने ९९% गुण मिळवून शाळेत अव्वल क्रमांक पटकावला होता.तो सन २०२२ मध्ये हायस्कूलमधील प्रथम क्रमांकाचा विद्यार्थी होता. सुमितच्या या उल्लेखनीय यशानिमित्त त्याचे आई-वडील, विद्याभवन प्राथमिक विद्यामंदिराचे मुख्याध्यापक सुभाष लाटे तसेच त्याला मार्गदर्शन करणाऱ्या सर्व शिक्षकवृंदाने त्याचे अभिनंदन केले आहे.त्याच्या यशामुळे शाळेचे नाव उजळले असून भावी वैद्यकीय सेवेसाठी एक गुणी डॉक्टर तयार होत आहे.
More Stories
संचालिका सौ.अंजली मोहेकर यांची विद्याभवन प्राथमिक विद्यामंदिरास सदिच्छा भेट
मोहेकर महाविद्यालयात ग्रंथालय शास्त्राच्या राष्ट्रीय चर्चासत्राचे आयोजन
भीमराव दादा सत्यवचनी व्यक्तिमत्व होतं – डॉ. माणिक डिकले