August 8, 2025

कुशल कर्मातच सौख्य आणि समृद्धी आहे – माया कांबळे

  • लातूर – “कुशल कर्मातच आपले सौख्य आणि समृद्धी आहे,”असे विचार भारतीय बौद्ध महासभेच्या व्याख्यात्या आणि केंद्रीय शिक्षिका माया कांबळे यांनी व्यक्त केले. लातूर शहरातील श्रावस्ती बुद्ध विहार ट्रस्ट संचालित श्रावस्ती बुद्ध विहार येथे सुरू असलेल्या १७ व्या वर्षावासाच्या दुसऱ्या रविवारी सकाळी १० वाजता बुद्ध वंदना कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
    या कार्यक्रमाचे नेतृत्व प्रतिभा सावळे यांनी केले.यानंतर संजीवनी गाडेराव यांनी धम्म ग्रंथाचे पठण केले.प्रमुख प्रवचनकार माया कांबळे, मंगलताई सुरवसे यांनी उपस्थितांना धम्माचे तत्वज्ञान समजावून सांगितले.प्रारंभी पाहुण्यांचा पंचशील स्कार्फ देऊन सत्कार करण्यात आला.
    माया कांबळे यांनी आपल्या प्रवचनात सांगितले की,“धम्माचा मूलाधार कर्मसिद्धांत आहे.कुशल कर्म जीवनात सुख,शांती आणि समृद्धी घडवते.दुष्कर्मामुळेच तुटते,दुःख येते.म्हणून सदैव कुशल,सात्त्विक आणि कल्याणकारी कर्म करावे.हेच बुद्धांचे आणि डॉ.बाबासाहेब आंबेडकरांचे सम्यक दर्शन आहे. आपले कर्म आत्मपरीक्षणातून शुद्ध केले पाहिजे,तेव्हाच जीवन गौरवशाली होते.”
    या कार्यक्रमाचे प्रास्ताविक विलास कांबळे घारगावकर यांनी तर संचालन आनंद डोनेराव यांनी केले. कार्यक्रमानंतर संजीवनी गाडेराव यांच्या हस्ते खीरदान करण्यात आले.
    या वेळी सुकुमार गोरे,सुशीला डोनेराव,अर्चना माने,ज्योती घारगावकर,पुष्पा शिंदे,मंगल धायगुडे,अनुसया कांबळे,डी.एस. सरवदे,विलास गायकवाड,वैशाली गायकवाड,जयश्री गायकवाड, सोजर कांबळे,विष्णू क्षीरसागर, बळीराम सूर्यवंशी, प्रभाकर करवंजे,उज्वल कांबळे यांच्यासह अनेक उपासक-उपासिका मोठ्या श्रद्धेने उपस्थित होते.
error: Content is protected !!