August 8, 2025

अल्पसंख्यांक विद्यार्थ्यांसाठी परदेशातील शिक्षणासाठी शिष्यवृत्ती

  • धाराशिव (जिमाका) – अल्पसंख्यांक विकास विभागामार्फत शैक्षणिक वर्ष २०२५-२६ करिता परदेशात पदव्युत्तर पदवी व पी.एच.डी.अभ्यासक्रमासाठी शिष्यवृत्ती योजनेअंतर्गत अर्ज मागविण्यात आले आहेत.१ ऑगस्टपर्यंत अर्ज सादर करण्याची अंतिम मुदत आहे.
    या योजनेची सविस्तर माहिती महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध असून, इच्छुक विद्यार्थ्यांनी https://fs.maharashtra.gov.in या वेबसाईटवर ऑनलाईन अर्ज भरून,त्याची प्रिंट दि.०१ ऑगस्ट २०२५ सायंकाळी ६:१५ वाजेपर्यंत समाज कल्याण आयुक्तालय,चर्च रोड,पुणे येथे पाठवावी.
    ही योजना अल्पसंख्यांक समुदायातील विद्यार्थ्यांना परदेशात उच्च शिक्षणासाठी आर्थिक पाठबळ देणारी असून,विद्यार्थ्यांनी संधीचा लाभ घ्यावा,असे आवाहन सहाय्यक आयुक्त सचिन कवले यांनी केले आहे.
error: Content is protected !!