कळंब – मराठवाड्यातील हजारो विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण देऊन त्यांच्या जीवनमानात आमूलाग्र बदल घडवणारे शिक्षण महर्षी कै. ज्ञानदेव मोहेकर गुरुजी यांचे वृत्तपत्रांतील स्वप्न साकार करण्यासाठी निर्भिड व अभ्यासू व्यक्तिमत्व असलेले सुभाष घोडके यांच्या लेखणीने साकारलेले ‘सा.साक्षी पावनज्योत’चे मार्गदर्शक तथा कर्तव्यदक्ष सचिव डॉ.अशोकराव मोहेकर व संचालिका प्रा.अंजली मोहेकर हे अमेरिकेत सांस्कृतिक व शैक्षणिक अभ्यासासाठी गेले होते. दोन महिन्याच्या अमेरिकेतील रहिवासानंतर दि.१५ जुलै २०२५ रोजी ते मायदेशी परतल्यावर ‘साक्षी पावनज्योत’ परिवाराच्या वतीने त्यांचा मोहेकर कॉलेजच्या कॅन्टीनमध्ये सत्कार करण्यात आला.तेथील अनुभव कथन करीत असताना,अमेरिकेत एकही बेरोजगार नसून एकही भीक मागणारा व्यक्ती आढळला नाही.त्याचबरोबर करार पद्धतीने जमीन कसण्यासाठी मिळत असून शेती मालाचा भाव तिथला शेतकरी ठरवतो.सेंद्रीय पद्धतीने शेती माल पिकवला जातो.उद्योग धंदयाशिवाय अवांतर धंदे करण्यासाठी तिथे कुणाला वेळच मिळत नसून सुसंस्कार युक्त लोकांची जीवनपद्धती खूप आवडली असल्याचे डॉ.अशोक दादांनी सांगितले. या सन्मानप्रसंगी मुख्य संपादक सुभाष घोडके व उपसंपादक माधवसिंग राजपूत यांच्या हस्ते विशेषांक,शाल व गुलाब पुष्प देऊन त्यांचा गौरव करण्यात आला.
या वेळी संचालक डॉ.संजय कांबळे,प्राचार्य डॉ.हेमंत भगवान, शि.म.ज्ञानदेव मोहेकर अग्रो इंडस्ट्रीजचे संचालक प्रा.बापूराव शेळके,उपप्राचार्य अप्पासाहेब मिटकरी,डॉ.दत्ता साकोळे,प्रा.गणेश पाटील,प्रा. सुशील शेळके,प्रा.आर.एस.भिसे,प्रा. गणेश आडे,कार्यकारी संपादक प्रा.अविनाश घोडके,संदीप सूर्यवंशी तसेच सर्व प्राध्यापक व सहकाऱ्यांची उपस्थिती होती.
More Stories
डिकसळ येथे माता रमाई जयंती उत्साहात साजरी
बस तासनतास थांबवून प्रवाशांना त्रास;संतप्त प्रवाशांची तक्रार
विद्याभवन प्राथमिक विद्यामंदिर येथे शिक्षण महर्षी कै.ज्ञानदेव मोहेकर गुरुजींना अभिवादन