August 8, 2025

सदगुणाने माणसे थोर आणि मोठी होतात – भिक्खु पय्यानंद थेरो

  • लातूर (दिलीप आदमाने) – शील,सदाचार,शांती, करुणा,मैत्री आणि नीती हे नैतिकतेचे प्रमुख अंग आहेत. सदाचाराचा मार्ग हा चांगुलपणाचा मार्ग आहे.त्यामुळे सद्गुणरुपी सन्मार्गाने मनुष्य जातीने जाण्याचा सातत्याने प्रयत्न मनुष्य जातीने केला पाहिजे.यामुळेच सद्गुणाने माणसे थोर आणि मोठी होतात असे प्रतिपादन भिक्खु पय्यानंद थेरो यांनी केले आहे.
    आषाढ पौर्णिमेनिमित्त वर्षावास अधिष्ठान व धम्मदेशना कार्यक्रमाचे आयोजन बौद्ध धम्म संस्कार प्रशिक्षण चॅरिटेबल ट्रस्टच्यावतीने महाविहार,धम्म संस्कार केंद्र,सातकर्णी नगर,बार्शी रोड,रामेगाव ता.जि.लातूर येथे येथे करण्यात आले होते.
    कार्यक्रमाच्या प्रारंभी भिक्खू संघ व उपस्थित मान्यवरांच्या हस्ते तथागत भगवान बुद्ध,डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेची पुष्पाने,धुपाने आणि दीपाने पूजा करून त्रिसरण पंचशील व बुद्ध वंदनेने करण्यात आली.
    महाराष्ट्र शासनाचा डॉ.बाबासाहेब आंबेडकर राज्यस्तरीय समाजभूषण पुरस्कार प्राप्त भुजंग कांबळे यांच्या समवेत नागोराव बोरीकर,मोहन शृंगारे,बसवंतप्पा उबाळे,डी.एस.नरसिंगे,संजय लातूरकर,अशोक कांबळे,डॉ. जितेंद्र वाघमारे,प्रा.यु.डी. गायकवाड,रवींद्र कांबळे, संजीवनी गडेराव या सर्वांचा जाहीर सत्कार समाज बांधवांच्या वतीने करण्यात आला.
    याप्रसंगी पुढे बोलताना भिक्खु पय्यानंद थेरो म्हणाले की,तथागत भगवान बुद्ध हे जगातील मानव जातीचे पहिले कल्याण मित्र आहेत.तथागत बुद्धाची शिकवण ही मानव कल्याणाची असल्याने तथागत बुद्ध हे खऱ्या अर्थाने जगाचे जगद्गुरु आहेत.जगाला बुद्धाच्या शिकवणीची गरज कायम भासणार आहे आणि म्हणून सर्व मनुष्य जातीने बुद्धाच्या तत्त्वांचे आपल्या जीवनात पालन करून स्वकल्याण करून घ्यावे.बुद्ध होणं म्हणजे शब्दांना आचरणानं आणि विचाराने शुद्ध होण आहे.असेही आपल्या धम्मदेसनेत भंतेजी म्हणाले.
    याप्रसंगी भंते बोधिराज यांचीही धम्मदेसना झाली.कार्यक्रमास पांडुरंग अंबुलगेकर,उत्तम कांबळे, इंजि.एम.एन.गायकवाड, ज्योतीराम लामतुरे,गणपतराव कदम,ये.पी.कांबळे,राहुल शाक्य मुनी,उदय सोनवणे,विलास अवशंख,करन ओव्हाळ,परमेश्वर आदमाने,कांताबाई सरोदे,शोभा सोनकांबळे,शकुंतला नेत्रगावकर, मिना कदम,निर्मला थोटे,शामल कांबळे,प्रतिभा आदमाने,कविता धावारे,शीला बनसोडे,कल्पना कांबळे आणि मोठ्या संख्येने बौध्द उपासक उपासिका उपस्थित होते.
    अवंती नगर,हडको कॉलनी,आणि एकता महिला मंडळाच्यावतीने सर्वांना भोजनदान करण्यात आले.
    यावेळी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मिलिंद धावारे यांनी केले तर आभार डॉ.अरुण कांबळे यांनी मानले.
error: Content is protected !!