August 9, 2025

हनुमान शिक्षक व शिक्षकेत्तर सेवकांची सहकारी पतसंस्थेच्या चेअरमनपदी प्रा.डाँ.साजेद चाऊस यांची निवड

  • कळंब – तालुक्यातील
    हनुमान शिक्षक व शिक्षकेत्तर सेवकांची सहकारी पतसंस्था घारगाव ता.कळंब येथे दि.११ रोजी संस्थेच्या चेअरमन निवड प्रक्रिया अध्यासी अधिकारी एस. आर.ईधारे (सहकार अधिकारी श्रेणी- २) यांच्या अध्यक्षतेखाली संस्थेच्या कार्यालयात बैठक पार पडली.यावेळी शिराढोण येथील शरदचंद्र महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.साजिद अमर चाऊस यांची सर्वानुमते बिनविरोध निवड करण्यात आली.
    यावेळी नवनिर्वाचित संचालक पदी भाऊसाहेब आत्माराम साळुंके,रामकिसन रामचंद्र गायकवाड,फुलचंद बाबुराव कदम, अरुण बाबुराव जाधव,सोहेल शकील पटेल, राजेश्वर नेताजीराव पाटील, संजय माणिक समुद्र, श्रीमती रोशन हसन शेख,श्रीमती सुरय्या अब्दुल रजाक डांगे, इब्राहिम अब्दुल शेख,व सतीश रावसाहेब काळे यांच्या निवडी करण्यात आल्या.
    प्राचार्य डॉ.साजिद चाऊस यांच्या या बिनविरोध निवडीबद्दल पत्रकार परवेज मुल्ला,भाजपाचे सतपाल बनसोडे,रि.पा.ई चे बंडुभाऊ बनसोडे,मनसे महावितरण विभागाचे राज्य सचिव महेंद्र कांबळे,दिनेश यादव,शिवराज पौळ,विलास थिटे,सचिन बिदादा, इलाही शेख,संतोष भांडे,डॉ.मुकिद शेख,महादेव माने,उमेश पुरी, रणजीत चव्हाण,सर्जेराव भालेराव आदींनी शुभेच्छा देऊन अभिनंदन केले.
error: Content is protected !!