August 8, 2025

धम्म जगून जीवनाला सर्वांग सुंदर करा – बौद्धाचार्य लक्ष्मण कांबळे

  • लातूर – श्रावस्ती बुद्ध विहार ट्रस्ट, लातूर येथे भारतीय बौद्ध महासभेच्या १७ व्या वर्षावासाच्या पहिल्या रविवारी सकाळी १० वाजता आयोजित करण्यात आलेल्या व्याख्यानमालेत बौद्धाचार्य लक्ष्मण कांबळे यांनी उपस्थितांना धम्माचे महत्त्व पटवून दिले.
    कार्यक्रमाची सुरुवात ज्योती घारगावकर यांच्या नेतृत्वाखाली बुद्ध वंदनेने झाली.अर्चना माने यांनी धम्मग्रंथाचे वाचन केले. प्रमुख पाहुण्यांचा गुलाबपुष्प देऊन सन्मान करण्यात आला.यामध्ये बौद्धाचार्य लक्ष्मण कांबळे,प्रशांत थोरात,संजीवनी गाडेराव (अध्यक्ष),तसेच महासभेचे पदाधिकारी यांचा समावेश होता.
    बौद्धाचार्य लक्ष्मण कांबळे यांनी आपल्या मार्गदर्शनपर भाषणात सांगितले की,पंचशील व आर्य अष्टांगिक मार्ग हेच धम्म जीवनाचे सार आहेत.या तत्वांचा अंगीकार केल्यास जीवन सर्वांग सुंदर बनते आणि आत्मिक प्रबोधन प्राप्त होते.
    कार्यक्रमात लहानथोर उपासक व उपासिका मोठ्या संख्येने उपस्थित होते.कार्यक्रमाचे प्रास्ताविक विलास कांबळे-घारगावकर यांनी तर सूत्रसंचालन आनंद डोनेराव यांनी केले.कार्यक्रमानंतर उपस्थितांसाठी केळी व बिस्किटांचे वाटप पुष्पा शिंदे आणि छाया ओहाळ यांनी केले.
    कार्यक्रमास उपस्थित मान्यवरांमध्ये सुशीला डोनेराव, विजया सरवदे,कांताबाई कांबळे, संजीवनी गुंजुरगे,जयश्री गायकवाड,शीला हिंगे,प्रतिभा सावळे,बळीराम सूर्यवंशी,डी.एस. सरवदे,उज्ज्वल कांबळे,प्रभाकर करवंजे,वैशाली गायकवाड, सुकुमार गोरे,छाया ओहाळ, धम्मपाली थोरात,सोजरबाई कांबळे,आशा कांबळे,मंगल धायगुडे यांचा समावेश होता.
error: Content is protected !!