August 8, 2025

बोरगाव ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी कविता कांबळे यांची बिनविरोध निवड

  • बोरगाव (तुपाचे) (सतिश घोडेराव) – ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी सौ.कविता गौतम कांबळे यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे.यापूर्वी सरपंच पदाची जबाबदारी सांभाळणाऱ्या सौ. अर्चना मोहन माने यांनी कार्यकाळातील साडेचार वर्षे पूर्ण केल्यानंतर आपल्या पॅनलमधील सदस्य सौ.कविता कांबळे यांना संधी देण्यासाठी राजीनामा दिला.
    दिनांक ८ जुलै २०२५ रोजी पार पडलेल्या सरपंच पदाच्या निवडणुकीत सौ.कविता कांबळे यांची एकमताने सरपंचपदी निवड करण्यात आली.या निवडणुकीचे अध्यासी अधिकारी म्हणून ए.सी. कावळे (विस्तार अधिकारी,पं.स.तुळजापूर) तर सहायक म्हणून ग्रामसेवक संजय नवगिरे यांनी काम पाहिले.
    या वेळी माजी सरपंच अशोक बोरगावकर,उपसरपंच लक्ष्मण पाटील,ग्रामपंचायत सदस्य राम कलकुटे,सौ.वंदना सुतार,माजी सरपंच सौ.अर्चना माने,बसवंतराव मुळे,तसेच गावातील अनेक मान्यवर व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
    नूतन सरपंच निवडीनंतर गावातून छत्रपती शिवाजी महाराज आणि महात्मा बसवेश्वर यांच्या पुतळ्यांना हार अर्पण करून मिरवणूक काढण्यात आली. शेवटी भिमनगर येथे विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून सौ.कविता कांबळे यांचा उत्साहात सत्कार करण्यात आला.
    कार्यक्रमात माजी सरपंच सौ. अर्चना माने,मोहन माने, आणि मारुती बनसोडे यांनी मनोगत व्यक्त करत नव्याने निवड झालेल्या सरपंचांचे अभिनंदन केले आणि पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या.
error: Content is protected !!