August 9, 2025

जि.प.माळकरंजा शाळेत गुरुपौर्णिमा साजरी

  • गोविंदपुर – गुरुपौर्णिमा अर्थात व्यास पौर्णिमेच्या निमित्ताने जिल्हा परिषद आदर्श प्राथमिक शाळा माळकरंजा येथे दि.१० जुलै २०२५ रोजी गुरुपौर्णिमा साजरी करण्यात आली.
    यावेळी शाळेतील सर्व विद्यार्थ्यांनी शिक्षकांना गुरुपौर्णिमेच्या शुभेच्छा दिल्या.या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळेचे शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष शरद गालट हे तर प्रमुख पाहुणे म्हणून शाळेतील मुख्याध्यापक संतोष भोजने हे उपस्थित होते.यावेळी नागझरवाडी येथील विद्यार्थी ऋषिकेश साळुंखे याने संतोष भोजने यांनी नागझरवाडी येथे केलेल्या कामाचा लेखाजोखा मांडत असे शिक्षक सर्व विद्यार्थ्यांना लाभावे असे सांगितले.सहशिक्षक हनुमंत घाडगे यांनी उपस्थितांना मार्गदर्शन करताना आपण केवळ चार भिंतीच्या आड शिकवणारेच आपले गुरु असतात असे नाही, तर जीवन जगत असताना आई-वडील,शाळेतील शिक्षक आणि समाज हे आपले सर्वच गुरु आहेत. निसर्गातील विविध पशु, पक्षी,प्राणी आणि वनस्पती झाडे, वेली हे सुद्धा आपल्याला अनेक धडे देत असतात.यातूनही आपण शिकलो पाहिजे आणि त्यांना गुरु मानले पाहिजे असे यावेळी सांगितले.कार्यक्रमास शाळेतील सहशिक्षिका श्रीमती भारती सूर्यवंशी,युवा प्रशिक्षणार्थी कुमारी मंजुश्री कराड,मकरंद नाडे यांच्यासह गावातील नागरिक महेश लोमटे,रत्नदीप लोमटे, लालासाहेब शितोळे यांच्यासह नागरिक व विद्यार्थी उपस्थित होते. उपस्थित विद्यार्थ्यांना ऋषिकेश साळुंखे यांनी आणलेला खाऊ वाटप करून कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.
error: Content is protected !!