August 8, 2025

“शिक्षण महर्षी कै.ज्ञानदेव मोहेकर गुरुजी यांच्या प्रतिमेचे पारा येथे पूजन संपन्न”

  • येरमाळा – ज्ञान प्रसारक मंडळाचे संस्थापक अध्यक्ष शिक्षण महर्षी कै.ज्ञानदेव मोहेकर गुरुजी यांना शिक्षक दिनानिमित्त जय भवानी विद्यालय,पारा येथे दि. १० जुलै २०२५ रोजी (गुरुवार) अभिवादन करण्यात आले.
    या प्रसंगी वरिष्ठ सहाय्यक शिक्षक संदीप भराटे यांच्या हस्ते गुरुजींच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आला.
    कार्यक्रमात श्रीमती शितल मेटे, सतीश वाघमारे,शहाजी सोलंकर, विकास माळी,दीपक मुळे,अमोल गवळी आदी शिक्षकवृंद, शिक्षकेतर कर्मचारी व सर्व विद्यार्थी उपस्थित होते.
    या भावनिक प्रसंगी उपस्थितांनी शिक्षण महर्षी कै.ज्ञानदेव मोहेकर गुरुजींच्या शिक्षणक्षेत्रातील मोलाच्या योगदानाचे स्मरण करीत,त्यांच्या कार्याला साजेशी आदरांजली अर्पण केली. कार्यक्रमाचे आयोजन अत्यंत शिस्तबद्ध आणि भावनिक वातावरणात पार पडले.
error: Content is protected !!