कृषि उत्पन्न बाजार समिती,कळंब ची स्थापना 30/11/1953 साली झाली बाजार समिती स्थापने वेळी वाघमोडे, सय्यद,कुलकर्णी अशा महान नागरीकांनी गावचा विकास व्हावा शेतकऱ्यांना आपला शेतमाल एकजागी विकता यावा या महान उद्देशाने आपले रोजी रोटी असणारी जमीन बाजार समितीस दान दिली होती. दान दिलेल्या जमीनीवर बाजार समितीचा कारभार सुरू करण्यात आला होता. बाजार समितीचे प्रथम सभापती म्हणून कामकाज पाहीलेले तत्कालीन विधीज्ञ व त्यांचे पासून सुरू झालेला प्रवास हा हळूहळू मंद गतीने का होईना सुरू होता बाजार समिती स्थापन होवून 70 वर्ष होवूनही बाजार समितीत बाजार समितीच्या वतीने शेतकऱ्यांच्या हीतासाठी आवश्यक असणाऱ्या पायाभूत सुविधा जसे की,रस्ते,गोदाम,विद्युत पुरवठा,प्रशस्त कार्यालय आदी गोष्टींची वाणवा होती.बाजार समितीत शेतीपूरक व्यवसायासह इतर ही व्यवसाय असल्याने तसेच अनेक गैर व्यवसाय अतिक्रमणे आदी बाबी असलेले बाजार समिती उत्पन्नाच्या बाबतची चांगली असूनही बदनामीच्या फेऱ्यात अडकल्याने हळूहळू उत्पन्नावर परिणाम होवू लागला बाजार समितीचे उत्पन्न घटल्याने पायाभूत सुविधा उभा करणे अशक्य वाटू लागले यातूनच बाजार समिती नंबर एक वरून घसरत जावून तीसऱ्या क्रमांकाकडे जावू लागले यास तत्कालीन संचालक मंडळ निर्णय घेणारे सभापती तत्कालीन अधिकारी तितकेच जबाबदार होते.बाजार समिती एक दिवस संपूष्ठात येईल असे वाटप असताना दि.22/5/2023 रोजी बाजार समितीच्या सभापती पदावर श्री.शिवाजी दिगांबर कापसे नावाचा अवलिया विराजमान झाला प्रथम दिवशी बाजार समितीच्या सर्व कर्मचाऱ्यांची बैठक लावून अत्तापर्यात झालेला खर्च,खर्चात करावयाची कपात,उत्पन्न वाढीची स्त्रोत,बाजार आवारात होणाऱ्या चोऱ्या आदी बाबीं बाबत कर्मचाऱ्यांकडून माहिती घेवून सभापती पदाचा प्रवास सुरू केला. बाजार समिती आवारात शेतकरी बांधवांसाठी आवश्यक असणाऱ्या गोष्टी दुर गेल्या होत्या,अनेक शेतकरी बांधवांना बोलावून घेवून त्यांच्या अडी अडचणी,त्यावर कोणते उपाय करता येतील यावर चर्चा करून बाजार समिती सुधरवण्या करीता 24 तासापैकी 12 ते 13 तास बाजार समितीच्या कार्यालयात उपस्थित राहून बाजार समितीच्या हितासाठी कोणते निर्णय घ्यावेत या बाबत व्यापारी असो.शेतकरी बांधव अधिकारी वर्ग यांचेशी चर्चा करून घेतलेले निर्णय पूर्णत्वास जाण्या करीता संचालक मंडळ यांना विश्वासात घेवून बाजार समितीत अनेक महत्वाचे निर्णय घेतले.बा.स.चे उत्पन्न वाढविण्यासाठी बंद असलेले स्त्रोत चालू केले,चालू असलेले जोरात पळविले तर काही नविन स्त्रोत सुरू करून उत्पन्न वाढविण्यासाठी प्रयत्न केला. तुटीमध्ये असणारी बाजार समिती खर्च कपाती मुळे नफ्यात आली. अनेकांकडे थकीत असणाऱ्या रक्कमा वसूल करून उत्पन्नात भर पाडल्याने बाजार समिती खात्यावर करोडो रुपये शिल्लक राहीले शिल्लक रक्कमेचा बाजार समितीच्या हितासाठी निर्णय व्हावा म्हणून 70 वर्षात न झालेले रस्ते पक्के करण्याचा निर्णय घेवून 3.52 लक्ष रू.ची प्रशासकीय मान्यता घेवून शेतकऱ्यांच्या जिव्हाळ्याचा व व्यापाऱ्यांच्या हिताचा प्रश्न मार्गी लावत आहेत. तत्कालीन मा.ना.श्री.तानाजी सावंत यांचे माध्यमातून 97 लक्ष रू.चा रस्ता अतिशय चांगल्या दर्जाचा करून घेतला.बाजार समितीत चोरी वर नियंत्रण व्हावे म्हणून 9 लक्ष रू.चे सी.सी.टी.व्ही बसविले. बाजार आवारात शेतकऱ्यांचे हेडसाळ होवू नये म्हणून प्रत्येक महिण्याला व्यापाऱ्यांच्या दुकानावर अचानक पणे भेट देवून चाललेल्या कारभाराची तपासणी केली जाते. मागील 2 वर्षात जर वर्षी 30 ते 35 लक्ष रू. शेतमाल तारण योजनेतून वाटप करून शेतकऱ्यांचे मदत करण्याचा प्रयत्न करत आहेत. मौजे शिराढोण येथील प्लॉट वाटप करून निधी उभा केला.तसेच गाळे बांधकामास कलम 12 (1) ची मंजूरी घेवून गाळे बांधकामाची प्रक्रिया सुरू केली आहे.खेडोपाड्यामध्ये खरेदी होवून बाजार समितीत येणाऱ्या शेतमालाची आवक कमी झाल्याने मौजे इटकुर येथे तात्पुरते उपबाजार सुरू करण्यासाठी प्रयत्न सुरू असून लवकरच त्या बाबत कार्यवाही पुर्णत्वास येईल. बाजार समितीतील कर्मचाऱ्यांशी शिस्त लावून त्यांच्या कामाचे कालावधी वाढवून आत्तापर्यंत न झालेली कामे ही पूर्ण करण्याचा त्यांचा मानस आहे.मागील 20 ते 25 वर्षाचे इतीवृत्त स्कॅन करून बाजार समिती डीजीटल करण्याचा प्रयत्न चालू आहे. बाजार समितीच्या अतिशन जिव्हाळ्याचे व शेतकऱ्यांपासून दूर असणारी वार्षीक सर्वसाधारण सभा अतिशय भव्य आणि दिव्य स्वरूपात केली.आपले मित्र व दानशूर व्यक्ती यांचा संपर्क करून वार्षीक सर्वसाधारण सभा 9 ते 10 लक्ष रू. खर्चाची करून बाजार समिती मार्फत फक्त 15000 रू. खर्च केला आहे. मागील 70 वर्ष व सभापती पदावर विराजमान झालेपासूनचा कालखंड तुलनात्मक दृष्टीने पाहीला असता मा.सभापती यांनी अतिशय महत्वाचे निर्णय घेवून बाजार समिती विकासाच्या दृष्टीने वाटचाल करत आहे. असू दिसून येत आहे. बाजार समितीत असलेले अतिक्रमण एकदा जमीनदोस्त केले होते पुढे जावून 25 ते 30 कोटी रू.चे 5 मजली शॉपिंग कॉम्प्लेक्स तसेच गोदाम, व्यापारी गाळे आदी सुरू करावयाचा मानस आहे. बाजार समितीस अशा विचार सरणीचा व काम करण्याची उर्मी असणारा सभापती मिळणे हे बाजार समितीचे भाग्य आहे. अशा सभापतीस त्यांच्या वाढदिवसा निमित्त शेतकरी,कष्टकरी,व्यापारी,कर्मचारी यांचे वतीने खूप खूप शुभेच्छा.
More Stories
संचालिका सौ.अंजली मोहेकर यांची विद्याभवन प्राथमिक विद्यामंदिरास सदिच्छा भेट
मोहेकर महाविद्यालयात ग्रंथालय शास्त्राच्या राष्ट्रीय चर्चासत्राचे आयोजन
भीमराव दादा सत्यवचनी व्यक्तिमत्व होतं – डॉ. माणिक डिकले