August 8, 2025

ज्ञान प्रसार विद्यालय मोहा येथे गुरुपौर्णिमेनिमित्त विविध उपक्रमाचे आयोजन

  • मोहा – ज्ञान प्रसारक मंडळाचे सचिव डॉ.अशोकराव मोहेकर यांच्या प्रेरणेने प्राचार्य अविनाश मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली ज्ञान प्रसार प्राथमिक विद्यालय मोहा येथे गुरुपौर्णिमेनिमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते . यामध्ये वृक्षारोपण , निबंध स्पर्धा , भाषण स्पर्धा इ . कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.या कार्यक्रमाच्या प्रसंगी प्रमुख पाहुणे ज्ञान प्रसारक मंडळ येरमाळा संस्थेचे जेष्ठ संचालक तात्यासाहेब पाटील (आबा ) हे होते.या कार्यक्रमाच्या वेळी प्रथम सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन प्रमुख पाहुणे यांच्या हस्ते करण्यात आले.या प्रसंगी भाषण स्पर्धेमध्ये कु.अंकिता मते,कु. राजश्री भोरे,कु.जोया शेख,कु.सृष्टी कांबळे,चि.ओमसिंह गरुड आदी विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला.निबंध स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांक कु.राजश्री भोरे,द्वितीय क्रमांक कु.अक्षरा माने तृतीय क्रमांक चि .भोंडवे शुक्राचार्य या सहभागी विद्यार्थ्यांना वही,पेन,शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले.तसेच गावाकडे चल माझ्या दोस्ता हे सुंदर गीत गायल्याबद्दल चि.ओमसिंह गरुड याला रोख स्वरूपाचे बक्षीस प्रशालेतील सहशिक्षक कमलाकर शेवाळे यांनी दिले.तसेच गुरुपौर्णिमेचे औचित्य साधून आज वृक्षारोपण देखील करण्यात आले यावेळी प्रमुख पाहुणे तात्यासाहेब पाटील,कमलाकर शेवाळे,धनंजय परजणे,श्रीमती पांचाळ उषा , जाधव पांडुरंग तसेच प्रशालेतील विद्यार्थी,विद्यार्थिनी बहुसंख्येने यावेळी उपस्थित होते.कार्यक्रमाचे प्रस्ताविक व सूत्रसंचालन प्रशालेतील सहशिक्षक कमलाकर शेवाळे यांनी केले तर आभार प्रदर्शन श्रीमती पांचाळ उषा यांनी केले.

error: Content is protected !!