August 8, 2025

ज्ञान प्रसार विद्यालयात गुरुपौर्णिमेचे आयोजन

  • मोहा – ज्ञान प्रसारक मंडळ येरमाळाचे सचिव डॉ. अशोकराव मोहेकर यांच्या प्रेरणेने प्राचार्य अविनाश मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली ज्ञान प्रसार माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय मोहा येथे गुरुपौर्णिमेनिमित्त कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.या कार्यक्रमासाठी अध्यक्ष म्हणून मुख्याध्यापक तथा प्राचार्य अविनाश मोरे तर प्रमुख पाहुणे म्हणून संस्थेचे प्रशासकीय अधिकारी रमेश भाऊ मोहेकर व संस्थेचे ज्येष्ठ संचालक तात्यासाहेब पाटील हे उपस्थित होते.
    कार्यक्रमाच्या सुरुवातीला महात्मा ज्योतिबा फुले व क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले तसेच शिक्षण महर्षी ज्ञानदेव मोहेकर गुरुजींच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा. नवनाथ करंजकर यांनी केले. याप्रसंगी विद्यार्थ्यांनी सर्व शिक्षकांचा गुलाब पुष्प देऊन सत्कार केला व गुरुजनांविषयी कृतज्ञता व्यक्त केली.अंजली मडके,आदिती मडके,सानिका बाराखोते,कविता भोंडवे,स्नेहा मडके,अनुष्का मडके,राधिका मडके,प्रियंका जाधव,प्रगती जाधव,आदिती माळी,सिमरन पठाण,आलिया पठाण,जिया पठाण,राजनंदिनी माळी आदी विद्यार्थिनींनी आपल्या मनोगतातून तसेच गीतामधून शिक्षकांविषयी आपल्या भावना मांडल्या.या कार्यक्रमाचे नियोजन सहशिक्षिका नीता सोनवणे व प्रा.प्रतिभा सावंत यांनी केले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन नर्गिस पठाण व अंकिता मडके या विद्यार्थिनींनी केले तर कार्यक्रमाचे आभार सहशिक्षक सतीश मडके यांनी मानले.कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी पर्यवेक्षक डी.बी. मडके,उच्च माध्यमिक विभागाचे प्रा.सुनील साबळे यांच्यासह सर्व शिक्षक शिक्षिका व शिक्षकेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.
error: Content is protected !!