August 8, 2025

वृक्षदिंडीतून पर्यावरण संवर्धनाचा संदेश

  • लातूर (दिलीप आदमाने) – लातूर शहरातील औद्योगिक परिसरामध्ये असलेल्या किसान शिक्षण प्रसारक मंडळाचे सचिव शिक्षक आमदार विक्रम काळे यांच्या प्रेरणेने प्राचार्य देविदास कोल्हे यांच्या मार्गदर्शनाखाली जिजामाता माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयामध्ये आषाढी एकादशीनिमित्त पर्यावरण संतुलनासाठी वृक्षदिंडी काढण्यात आली.यावेळी विद्यार्थ्यांनी आपल्या हातामध्ये विविध वृक्षांची रोपे घेऊन झाडे लावा व झाडे जगवा हा संदेश देत “रामकृष्ण हरी,एक झाड घरोघरी” हा जय घोष करत विद्यालयाच्या परिसरात दिंडी काढण्यात आली.या दिंडीत विद्यार्थी वारकऱ्यांच्या वेशभुषे मध्ये मोठ्या संख्येने उपस्थित होते. हे शैक्षणिक वर्ष सुखाचे समृद्धीचे व यशाचे जाऊ दे,पाऊस पडू दे,शेतकरी सुखी होऊ दे!असं मागणं यावेळी विद्यार्थ्यांनी विठ्ठलाकडे मागितलं.या दिंडीचे उद्घाटन प्राचार्य देविदास कोल्हे यांच्या हस्ते करण्यात आले. नगरसेविका सौ.रागिणीताई यादव,ग्रीन वृक्ष लातूर फाउंडेशनचे डॉ.भास्कर बोरगावकर,पद्माकर बागले,दयाराम सुडे,बाळासाहेब बावणे यांनी या वृक्षदिंडीत सहभाग घेतला.

  • यावेळी प्रा.दत्तात्रय मुंडे,प्रा. बाबासाहेब सोनवणे,गोकुळ मतकंटे,राजकुमार शिंदे,शंकर पांचाळ,भाग्यशाली गुडे,सुभाष म्हेत्रे,वैशाली वाघमारे,वैशाली फुले, अरविंद पदातुरे,सुधीर बाळापुरे,संतोष जोहरी,बालाजी साबळे,राजाभाऊ वाघमारे, बालाजी पवार,आप्पासाहेब देशमुख व अर्जुन कांबळे इ.यावेळी उपस्थित होते.
error: Content is protected !!