कळंब -शहरातील सावित्रीबाई फुले माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात जागतिक योग दिन साजरा करण्यात आला. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी विद्यालयाचे मुख्याध्यापक तथाप्राचार्य काकासाहेब मुंडे हे होते. यावेळी योग शिक्षक म्हणून विद्यालयाचे मुख्याध्यापक तथाप्राचार्य काकासाहेब मुंडे व सहशिक्षक परमेश्वर मोरे यांनी योगशिक्षक म्हणून काम पाहिले. यावेळी विद्यालयातील अजित सचिन यादव इयत्ता 7वी व कृष्णा अरविंद भांडे इयत्ता 8वी इयत्तेतील विद्यार्थ्यांनी शीर्षासन केले. योगामध्ये जॉगिंग, सूर्यनमस्कार, अनुलोम विलोम, कपालभाती, ब्राह्मरी आदी प्राणायाम घेण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सांस्कृतिक विभाग प्रमुख परमेश्वर मोरे यांनी केले तर आभार प्रदर्शन पर्यवेक्षक शंकर गोंदकर यांनी मानले यावेळी शाळेतील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
More Stories
संचालिका सौ.अंजली मोहेकर यांची विद्याभवन प्राथमिक विद्यामंदिरास सदिच्छा भेट
मोहेकर महाविद्यालयात ग्रंथालय शास्त्राच्या राष्ट्रीय चर्चासत्राचे आयोजन
भीमराव दादा सत्यवचनी व्यक्तिमत्व होतं – डॉ. माणिक डिकले