June 22, 2025

ज्ञान प्रसार विद्यालयात योग दिन उत्साहात साजरा

  • मोहा – ज्ञान प्रसारक मंडळ येरमाळाचे सचिव डॉ.अशोकराव मोहेकर यांच्या प्रेरणेने मुख्याध्यापक तथा प्राचार्य अविनाश मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली दि.21 जून 2025 रोजी आंतरराष्ट्रीय योग दिनाचे औचित्य साधून ज्ञान प्रसार विद्यालयात योग दिन अतिशय उत्साहात साजरा करण्यात आला. याप्रसंगी योगाचार्य येरमाळा मंडळ अधिकारी एन. डी.नागटिळक व योगाचार्य ह.भ.प. अशोकबप्पा मडके यांनी विद्यार्थ्यांना तसेच कर्मचाऱ्यांना विविध योगासने, तसेच प्राणायामाचे धडे दिले. सुरूवातीला योगाचार्यांनी चांगल्या आरोग्यासाठी आपल्या जीवनातील व्यायामाचे तसेच योगासनाचे महत्त्व सांगितले.
    त्यानंतर योगाचार्यांनी योगासनाचे व प्राणायामाचे प्रात्यक्षिक करून दाखविले. याप्रसंगी सर्वांनी अतिशय उत्साहात योगासने व प्राणायाम केले. याप्रसंगी योगाचार्य एन.डी.नागटिळक व अशोकबप्पा मडके यांचा सत्कार मुख्याध्यापक तथा प्राचार्य अविनाश मोरे यांच्या हस्ते करण्यात आला. तसेच योग समितीतर्फे नवनियुक्त मुख्याध्यापक तथा प्राचार्य अविनाश मोरे यांचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन तथा आभार प्रदर्शन सहशिक्षक सतीश मडके
    यांनी केले.कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी क्रीडा शिक्षक संजय मडके व प्रा.नवनाथ करंजकर तसेच पर्यवेक्षक धनंजय मडके यांच्यासह सर्व शिक्षक, शिक्षिका व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची परिश्रम घेतले.
    कार्यक्रमाला सर्व कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते.
error: Content is protected !!