कळंब – आंतरराष्ट्रीय योगा दिनानिमित्त ज्ञान प्रसारक मंडळ येरमाळाचे सचिव डॉ.अशोकराव मोहेकर यांच्या प्रेरणेने प्राचार्य डॉ.हेमंत भगवान यांच्या मार्गदर्शनाखाली शिक्षण महर्षी ज्ञानदेव मोहेकर महाविद्यालय व मुख्याध्यापक व्यंकट कुंभार यांच्या मार्गदर्शनाखाली विद्याभवन हायस्कूल कळंब मधील एनसीसी विभागाच्या वतीने आंतरराष्ट्रीय योगा दिन साजरा करण्यात आला होता.या योग शिबिराचे प्रशिक्षक म्हणून योग गुरु ॲड.सुरेश कुलकर्णी यांनी उपस्थिताना योगाचे धडे दिले. आजच्या धावपळीच्या युगामध्ये तणावमुक्त जीवन जगण्यासाठी योग क्रिया कशाप्रकारे मदत करते यासंबंधीची माहिती देत त्यांनी योगाचे महत्त्व सांगितले.मनुष्याला आनंदी जीवन जगण्यासाठी योगा हा गुरुकिल्ली म्हणून सिद्ध होतो असे त्यांनी म्हटले.या योग शिबिराचा समारोप प्राचार्य डॉ. हेमंत भगवान यांच्या मार्गदर्शनाने करण्यात आला.या कार्यक्रमासाठी महाविद्यालयाचे उपप्राचार्य तथा सा.साक्षी पावनज्योत उपसंपादक डॉ.कमलाकर जाधव,उपप्राचार्य प्रा.अप्पासाहेब मिटकरी, डॉ.साहेबराव बोंदर,डॉ.श्रीकांत भोसले,डॉ.दत्ता साकोळे, डॉ. दीपक सूर्यवंशी,ग्रंथपाल अनिल फाटक,प्रा.विलास अडसूळ, प्रा.संदीप देवकते,डॉ.अर्चना मुखेडकर,प्रा.सुषमा घाटपारडे,प्रा. प्रणिता खोसे,प्रा.शिवकन्या मांडे, प्रा.भीम टेळे, सहाय्यक ग्रंथपाल तथा सा.साक्षी पावनज्योत उपसंपादक अरविंद शिंदे,ग्रंथालयतील कर्मचारी गावडे,प्राध्यापक व शिक्षकउत्तर कर्मचारी ,एनसीसी विभागातील विद्यार्थ्यां मोठ्या सहभागी झाले होते. हे योग शिबिर पार पाडण्यासाठी एनसीसी विभाग प्रमुख लेफ्टनंट डॉ.पावडे के. डब्ल्यू. लेफ्टनंट सरस्वती वायबसे, विद्याभवन हायस्कूल एनसीसी विभागाचे प्रमुख आप्पासाहेब वाघमोडे, राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रमाधिकारी राघवेंद्र ताटीपामुल आदीने परिश्रम घेतले.
More Stories
सावित्रीबाई फुले विद्यालयात योग दिन साजरा
पाथर्डी शाळेत योग दिवस उत्साहात साजरा
नूतन तालुकाप्रमुख सचिन काळे यांचा तालुका काँग्रेस कमिटीच्या वतीने सत्कार