June 18, 2025

विद्यामंदिर हायस्कूलमध्ये नुतन विद्यार्थ्यांचे उत्साहात स्वागत

  • आष्टा (संघपाल सोनकांबळे) – ज्ञान प्रसारक मंडळ येरमाळाचे कर्तव्यदक्ष सचिव डॉ.अशोकराव मोहेकर यांच्या प्रेरणेने मुख्याध्यापक आनंद रामटेके यांच्या मार्गदर्शनाखाली भूम तालुक्यातील आष्टा येथील विद्यामंदिर हायस्कूलमध्ये नविन विद्यार्थ्यांच्या स्वागताचा कार्यक्रम पार पडला.यावेळी प्रशालेचे मुख्याध्यापक आनंद रामटेके यांच्या हस्ते सावित्रीबाई फुले व शिक्षण महर्षी ज्ञानदेव मोहेकर गुरुजी यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.
    यावेळी प्रशालेचे मुख्याध्यापक आनंद रामटेके यांनी नूतन विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.
    त्याच बरोबर नवीन विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्यामध्ये रजिस्टर,पेन तर प्रशालेच्या वतीने पाठ्यपुस्तके,गुलाबपुष्प,खाऊ आदी वाटप करण्यात आले.

  • याप्रसंगी सहशिक्षिक नामदेव अंनत्रे,शशिकांत मांजरे,संघपाल सोनकांबळे,सहशिक्षिका श्रीमती निर्मला वाघमारे,सुजितकुमार जाधव,बबन यादव व प्रशालेतील विद्यार्थी,विद्यार्थिंनी यावेळी बहुसंख्येने उपस्थित होते.
error: Content is protected !!