मोहा – ज्ञान प्रसारक मंडळ येरमाळाचे कर्तव्यदक्ष सचिव डॉ.अशोकराव मोहेकर यांच्या प्रेरणेने मुख्याध्यापक अविनाश मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली ज्ञान प्रसार प्राथमिक विद्यालय मोहा येथील इयत्ता ५ वी नविन विद्यार्थ्यांच्या स्वागताचा कार्यक्रम पार पडला.यावेळी प्रशालेचे मुख्याध्यापक तथा प्राचार्य अविनाश मोरे तसेच ज्ञान प्रसारक मंडळ येरमाळा संस्थेचे जेष्ठ संचालक तात्यासाहेब पाटील यांनी सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन केले.यावेळी प्रशालेचे मुख्याध्यापक तथा प्राचार्य अविनाश मोरे यांनी नूतन विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.त्याच बरोबर सहशिक्षक कमलाकर शेवाळे यांच्या वतीने इयत्ता पाचवी मधील विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचेमध्ये रजिस्टर,पेन तर प्रशालेच्या वतीने पाठ्यपुस्तके , गुलाबपुष्प,खाऊ इत्यादी प्रमुख पाहुणे यांच्या हस्ते करण्यात वाटप करण्यात आले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कमलाकर शेवाळे यांनी केले तर आभार श्रीमती . पांचाळ उषा यांनी केले.या कार्यक्रमाच्या प्रसंगी अमरसिंह पाटील,परजने,श्रीमती.सोनवने निता,जाधव पांडूरंग तसेच प्रशालेतील विद्यार्थी,विद्यार्थिंनी यावेळी बहुसंख्येने उपस्थित होते.
More Stories
ज्ञान प्रसार विद्यालयात गुणवंत शिक्षकांचा सत्कार
शिक्षण महर्षी ज्ञानदेव मोहेकर ॲग्रो इंडस्ट्रीजमध्ये रोलर पूजन उत्साहात संपन्न
शिक्षण महर्षी ज्ञानदेव मोहेकर गुरुजी यांना अभिवादन