August 9, 2025

विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर हास्य फुलवणारा उपक्रम – मातोळा शाळेच्या वतीने शालेय बॅग व वह्यांचे वाटप”

  • मातोळा – ज्ञान प्रसारक मंडळ येरमाळाचे कर्तव्यदक्ष सचिव डॉ.अशोकराव मोहेकर यांच्या प्रेरणेतून व प्राचार्य तथा मुख्याध्यापक अजित साळवे यांच्या मार्गदर्शनाखाली श्री. माधवराव भोसले माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय,मातोळा ता.औसा येथे नववर्षी इयत्ता पाचवीत दाखल झालेल्या विद्यार्थ्यांचे उत्साहवर्धन करण्यासाठी शालेय बॅग व वह्यांचे वाटप करण्यात आले.
    संक्राळ, हसलगन, माळुंब्रा व हिप्परगा या गावांतील नव्याने प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांना ही शैक्षणिक भेट देण्यात आली.
    या उपक्रमामध्ये पर्यवेक्षक श्री. डबे,सहाय्यक शिक्षक श्री.लहाने, श्री.मुळे,विजयकुमार भोसले, बाळासाहेब पांचाळ,वाजिद शेख, श्रीमती दिवे मॅडम,प्रशांत भोसले आदींची विशेष उपस्थिती होती.
    या स्तुत्य उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये नवीन शैक्षणिक वर्षाची उमेद निर्माण झाली असून पालक व ग्रामस्थांकडून याचे विशेष कौतुक करण्यात येत आहे.
error: Content is protected !!