कळंब – भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे शताब्दी वर्ष सध्या सुरू आहे. दि.२६ डिसेंबर २०२५ रोजी पक्षाला शंभर वर्ष पूर्ण होत आहेत.भा.क.प चे महाराष्ट्र राज्य अधिवेशन २२ जून ते २४ जून दरम्यान नाशिक येथे होणार आहे. याचाच भाग म्हणून धाराशिव जिल्ह्याचे त्रैवार्षिक अधिवेशन कळंब शहरात पार पडले. अधिवेशनाचे उद्घाटन कॉ.अभय टाकसाळ यांनी केले तर शेकाप चे बाळासाहेब धस व रिपब्लिकन सेनेचे अनिल हजारे यांनी शुभेच्छा दिल्या तर उद्घाटन सत्राचा समारोप कॉ. रेणके यांनी केला. अधिवेशनासाठी कॉ.अभय टाकसाळ हे पक्ष निरीक्षक म्हणून उपस्थित होते.आता आपल्याला दुसऱ्या स्वातंत्र्याच्या लढ्यासाठी सज्ज व्हावे लागेल.हा काळ आपल्यासाठी डावा विचार रुजण्यासाठी योग्य काळ आहे. सध्या राज्यात व देशात भाजपा चे सरकार आहे ते जनता विरोधी सरकार आहे.शेतकरी,कामगार , कर्मचारी यांच्या प्रश्नांना घेऊन सरकार ला जाब विचारावा लागेल.यासह पक्ष सभासद वाढवून पक्ष मजबूत करणे गरजेचे आहे. या अधिवेशनात नवीन जिल्हा कौन्सिल निवडण्यात आली.त्या मध्ये कॉ.अरुण रेनके,आकाश शिंदे,लखन भोंडवे,वैशाली जाधव, अजित माळी,शुभम तातूडे, बाळासाहेब गिरी यांच्यासह ११ जणांची कौन्सिल निवडण्यात आली.
More Stories
फॉरेस्टच्या गवतावर तणनाशक फवारणी करून वृक्षलागवडीची नासधूस:वनपालावर कारवाईची मागणी
रक्षाबंधन
प्रथम क्रमांक पटकावणाऱ्या प्रीती महादवारसह यशस्वी छात्राध्यापकांचा गौरव सोहळा उत्साहात