August 9, 2025

पहिला आयुर्वेदिक हिमोफिलिया संशोधन प्रकल्प ‘रक्तामृत’चा धाराशिवमध्ये दिमाखदार शुभारंभ

  • धाराशिव (जिमाका) – हिमोफिलिया या दुर्मिळ व अनुवांशिक रक्तस्त्राव विकारावर आयुर्वेदिक उपाय शोधणारा जगातील पहिला संशोधन प्रकल्प ‘रक्तामृत इन हिमोफिलिया रिसर्च अँड डेव्हलपमेंट सेल’ शासकीय आयुर्वेद महाविद्यालय व रुग्णालय,धाराशिव येथे दिमाखात सुरु झाला.
    या ऐतिहासिक उपक्रमाचा शुभारंभ ४ ऑगस्ट २०२५ रोजी संपन्न झाला.महाराष्ट्र शासनाच्या वैद्यकीय शिक्षण विभागाच्या पुढाकाराने व आर.एम.धारिवाल फाउंडेशन,पुणे आणि इंटास फाउंडेशन यांच्या सहकार्याने हा प्रकल्प राबविण्यात येत आहे.
    प्रकल्पाची वैशिष्ट्ये – महाराष्ट्रभरातून निवडलेल्या १०० हिमोफिलिया रुग्णांवर निःशुल्क उपचार करण्यात आले.४५ दिवसांच्या अंतराने ६ शिबिरे घेण्यात आली.रक्ताच्या आवश्यक तपासण्या, सल्ला,औषधोपचार व फिजिओथेरपी मोफत.इंटास फाउंडेशनमार्फत Factor 8 इंजेक्शन व फिजिओथेरपी किट वाटप करण्यात आली.
    या संशोधन प्रकल्पाचे नेतृत्व डॉ.एन.एस.गंगासागरे (अधिष्ठाता, आयुर्वेद महाविद्यालय) यांच्या मार्गदर्शनात होत असून,राष्ट्रपती पुरस्कार विजेते डॉ.शुभम रामनारायण धूत यांनी संकल्पना मांडली आहे.‘रक्तामृत वटी’ ही औषधी त्यांच्या सात वर्षांच्या अभ्यासातून विकसित झाली असून,अनेक रुग्णांना याचा सकारात्मक लाभ झाला आहे.
    प्रमुख मान्यवरांची मते –
    शोभाताई धारिवाल,उपाध्यक्ष,आर. एम.धारिवाल फाउंडेशन – “‘रक्तामृत’ केवळ संशोधन नव्हे, मानवतेसाठी आशेचा किरण आहे.”
  • किर्ती किरण पुजार, जिल्हाधिकारी – “धाराशिवातून संशोधन क्रांती उभी राहत आहे,हे गौरवाचे आहे.”
  • डॉ. मैनाक घोष,मुख्य कार्यकारी अधिकारी,जिल्हा परिषद – “हिमोफिलिया रुग्णांना नवसंजीवनी देणारी क्रांतिकारी संकल्पना.”
  • डॉ.शुभम धूत – “लवकरच ही औषधी जगभरातील रुग्णांसाठी उपलब्ध करण्याचा निर्धार आहे.”
  • इतर वैद्यकीय अधिकारी व तज्ज्ञांनीही प्रकल्पाचे स्वागत करत त्याचे सामाजिक व वैज्ञानिक मूल्य अधोरेखित केले.
  • मान्यताप्राप्त प्रकल्प –
    CTRI (Clinical Trials Registry of India) आणि Institutional Ethics Committee मान्यता प्राप्त.जागतिक आरोग्य संघटनेत (WHO) नोंद घेण्यात आली आहे.
    शासकीय आयुर्वेद महाविद्यालयाच्या पुढाकाराने,आकाशवाणीचे दौलत निपाणीकर यांच्या निवेदनात कार्यक्रम पार पडला.प्रास्ताविक डॉ. टी.वाय.स्वामी तर आभार प्रदर्शन डॉ.सचिन टिके यांनी केले.रुग्ण अनुभव कथन,प्रमाणपत्र वितरण,श्रमपरिहार सत्रामुळे कार्यक्रमाला भावनिक व वैज्ञानिक अधिष्ठान मिळाले.
error: Content is protected !!