धाराशिव – कसबे तडवळे येथील एस.पी.शुगर ॲन्ड प्रा.लि.कडे जानेवारी २०२५ पासून ऊस उत्पादकांची बिले थकीत असून पेरणीच्या तोंडावर तरी बीले तात्काळ द्यावीत अन्यथा आमरण उपोषणाचा इशारा जिल्हाधिकारी यांना निवेदनाद्वारे देण्यात आला आहे. चेअरमन फोन उचलत नाहीत व कर्मचारी उडवा उडवीचे उत्तरे देऊन ऊस उत्पादकांना वेठीस धरत आहेत.शेतकऱ्यांच्या सहमतीशिवाय दहा हजार रुपये कपात करू नयेत अशाही तक्रारी या निवेदनात केल्या आहेत. त्वरित बिले अदा न केल्यास दिनांक ११ जून २०२५ पासून आमरण उपोषणास बसणार असल्याचा इशारा दिला असून या निवेदनावर दीपक जाधव, श्रीकृष्ण पाटील,बसवेश्वर भागुडे, मंचकराव पाटील,दत्तू बोंदर, श्रीराम बोंदर,शिवाजी राख, उत्तम नागरगोजे,बाळू मस्के, आश्रुबा पवार आदीसह कायापूर,
चंदन सावरगाव,चिंचपूर,मंगरूळ,करंजकल्ला,सावळेश्वर पैठण,कोथळा,एकुरगा,कोथळा आदी गावच्या ऊस उत्पादकांच्या स्वाक्षरी आहेत.
More Stories
फॉरेस्टच्या गवतावर तणनाशक फवारणी करून वृक्षलागवडीची नासधूस:वनपालावर कारवाईची मागणी
महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या हस्ते चॅटबोटचे उद्घाटन
आंतरराष्ट्रीय व्हॉलीबॉल स्पर्धेसाठी जिल्हास्तरीय निवड चाचणी ११ ऑगस्टला