कळंब – राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर त्रिशताब्दी जयंती महोत्सव २०२५ निमित्त आयोजित केलेल्या चित्रकला व निबंध स्पर्धेचे बक्षीस वितरण आणि विविध क्षेत्रातील उत्कृष्ट कामगिरी केलेल्या यशवंतांचा गौरव सोहळा गुरुवार दि २९ मे रोजी मान्यवरांच्या उपस्थितीत पार पडला.कार्यक्रमाचे आयोजन महाराणी अहिल्यादेवी समाज प्रबोधन मंच,मुंबई आणि फ्रेंड्स फॉरेव्हर फाउंडेशन च्या वतीने करण्यात आले होते. शहरातील व तालुक्यातील जवळ पास २२ शाळांमधून २२०० विद्यार्थी सहभागी झाले होते. चित्रकला लहान गटात प्रथम पारितोषिक रू ३०००/- लता मंगेशकर विधालयाची आधिश्वरी स्वामी, द्वितीय रू२०००/- चे संत बौधले महाराज शाळेचा समर्थ पवार तर तृतीय रू १०००/- चे बक्षीस जि प प्रशाला तांदुळवाडी च्या रेणुका पानढवळे हिने पटकावले. उत्तेजनार्थ प्रत्येकी २०० रु प्रणव डिकले,उमर तांबोळी, वैदेही लोंढे, वैभवी वाघमोडे,अक्षय गिरी,प्रिया साखरे,भक्ती सलगर यांना मिळाले. चित्रकलेच्या मोठ्या गटात प्रथम क्रमांकाचे ३०००/-रु चे बक्षीस सावित्रीबाई फुले प्रशालेच्या अभिराज वाघमारे, द्वितीय क्रमांकाचे २०००/- रू चे लता मंगेशकर शाळेच्या समृद्धी माळी तर तृतीय क्रमांकाचे १०००/- रू चे बक्षीस विधाभवन प्रशालेच्या जान्हवी सोनवणे हिला मिळाले. उत्तेजनार्थ २००/- रु चे श्रेयश चोंदे, शिवम पोते,पृथ्वीराज पिंगळे, बतुल शेख,श्वेता कांबळे, प्रांजली झाडे,अक्षरा काळे यांना मिळाले. निबंध स्पर्धेत प्रथम ३०००/- रू चे बक्षीस कॅनव्हास शाळेची वैदेही जोशी, द्वितीय पारितोषिक २०००/- रु चे शारदा इंग्लिश स्कूल च्या शारदा जाधव तर तृतीय क्रमांकाचे १०००/- रु चे बक्षीस जि प प्रशाला इटकूर च्या यश कदम याला मिळाले. उत्तेजनार्थ २००/- रु प्रत्येकी सुहाना बेग, अंकिता घाटूळे, देवी मुंडे, सृष्टी इंगोले यांना मिळाले. यावेळी शालांत प्रमाणपत्र परीक्षेत पैकीच्या पैकी मार्क्स घेणारे विधाभवन प्रशालेचे आसावरी गोसावी व कृष्णा आडसुळ यांना गौरवण्यात आले. सतत १२ वर्षे शालांत प्रमाणपत्र परीक्षेचा १००% निकालाची परंपरा टिकविणा-या मॉडेल इंग्लिश स्कूल, नॅशनल लॉ युनिव्हर्सिटी पवई मुंबई येथे प्रवेशीत झालेली राजनंदीनी दत्ता पवार, कळंब चे भुषण ठरलेली आशियाई ज्युनियर स्कॅश स्पर्धेचे नेतृत्व करणारी वसुंधरा मुकुंद नांगरे, येथील वरिष्ठ बालरोगतज्ञ व प्रयोगशील शेतकरी डॉ. रामकृष्ण लोंढे यांची व्हियेतनाम शेतकरी अभ्यास दौ-यासाठी निवड झाल्याबद्दल व आर्थिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करून १०० कोटी रुपये ठेविचा पल्ला पार केल्याबद्दल कै. वसंतदादा पाटील उत्कृष्ट नागरी बॅंक पुरस्कारासाठी निवड झाल्या बद्यल प्रियदर्शिनी अर्बन को ऑप बॅंकेचे अध्यक्ष श्रीधर भवर व बॅंक मॅनेजर प्रविण शिंदे यांचा सत्कार मान्यवरांच्या हस्ते अहिल्यादेवींचे स्मृतिचिन्ह,शाल व पुष्पगुच्छ देऊन करण्यात आला. यावेळी प्रमुख पाहुणे प्रा. सोमनाथ लांडगे सर ( धाराशिव) आणि शिव व्याख्याते महादेव खराटे यांनी अहिल्यादेवींच्या जिवनावर सविस्तर मार्गदर्शन केले. अध्यक्षीय समारोप संतोष घाटूळे यांनी केला. सुत्रसंचालन डॉ.अशोक शिंपले यानी केले तर आभार प्रदर्शन नानासाहेब कवडे सरांनी केले. शेवटी राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली. कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी फ्रेंड्स फॉरेव्हर ग्रुप चे अध्यक्ष अतुल कवडे, सचिव डॉ. अभिजित लोंढे,गोपाळ उबाळे, शंकरचंद्र खंडागळे,परमेश्वर मोरे, पिंटू कसपटे,प्रबोधन मंचाचे डॉ. रामकृष्ण लोंढे,नानासाहेब कवडे, संतोष घाटूळे,अजीत गायके, झेलम शिंपले,सचिन सलगर यांनी परिश्रम घेतले.
More Stories
“धाडस,विचार आणि सेवा यांचा संगम – पँथर अशोक कसबे” (वाढदिवस विशेष लेख)
अधिकारी व्हायचे असेल तर जि.प शाळेतच प्रवेश घ्या – उपशिक्षणाधिकारी दत्तात्रय लांडगे
छत्रपती संभाजी विद्यालयात प्रवेश उत्सव उत्साहात साजरा