June 20, 2025

ज्ञान प्रसार विद्यालयाचे दहावीच्या परीक्षेत घवघवीत यश

  • मोहा – ज्ञान प्रसारक मंडळ येरमाळाचे कर्तव्यदक्ष सचिव डॉ.अशोकराव मोहेकर यांच्या प्रेरणेने मुख्याध्यापक अविनाश मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली दहावीच्या परिक्षेत मोहा येथील ज्ञान प्रसार विद्यालयाचा निकाल 96.39% टक्के लागला असून चि.माळी प्रथमेश नाना या विद्यार्थ्याने 90.00%.गूण घेऊन प्रथम येण्याचा मान मिळवला आहे तर मडके ओंकार बालाजी -86.00% गूण घेऊन द्वितिय आला आहे.
    कु.भोंडवे प्रिया शुक्राचार्य- 83.60% व चि.लकडे श्रीनाथ अंकुश 83.60% यांनी तृतीय क्रमांक पटकावला आहे. विद्यालयातील कु.मडके इश्वरी चंद्रकांत 83.20%.
    कु.बाराखोते साक्षी संजय 82.60%.कु.जाधव साक्षी रामराजे 82.40%.वरपे अथर्व उमाकांत 82.00%,माळी शिवम हनुमंत 81.40%,कु. बोराडे योगीता संजय 80.60% यांच्यासह 16 विद्यार्थी विशेष प्राविण्यासह उत्तीर्ण झाले असून 31 विद्यार्थी प्रथम श्रेणीत उत्तीर्ण झाले आहेत तर 30 विद्यार्थी द्वितीय श्रेणीत उत्तीर्ण झाले आहेत.
    या यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष अनिलबापू मोहेकर,सचिव डॉ.अशोकदादा मोहेकर, मुख्याध्यापक अविनाश मोरे संस्थेचे ज्येष्ठ संचालक तात्यासाहेब पाटील, प्रशासकीय अधिकारी रमेशभाऊ मोहेकर, पर्यवेक्षक डी.बी.मडके,उच्च माध्यमिक विभागाचे पर्यवेक्षक प्रा.सुनील साबळे तसेच नुकतेच सेवानिवृत्त झालेले मुख्याध्यापक संजय जगताप यांनी सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे तसेच मार्गदर्शक शिक्षकांचे अभिनंदन केले आहे.
error: Content is protected !!