पारा – ज्ञान प्रसारक मंडळ येरमाळाचे कर्तव्यदक्ष सचिव डॉ.अशोकराव मोहेकर यांच्या प्रेरणेने मुख्याध्यापक नवनाथ सूर्यवंशी यांच्या मार्गदर्शनाखाली वाशी तालुक्यातील पारा येथील जय भवानी विद्यालयातील एकूण ३८ विद्यार्थ्यांनी दहावी बोर्डाची परीक्षा दिली होती. या निकालामध्ये प्रथम – विरेंद्र अरुण मस्के ८५.४० %, द्वितीय – ओंकार सोमनाथ माळी ८१.८०%,तृतीय समीक्षा बालाजी बगल ८१.६०% तसेच प्रशालेत विशेष प्राविण्य श्रेणी ०८ . प्रथम श्रेणी – १२,द्वितीय श्रेणी – ११ उत्तीर्ण श्रेणी ०३ या सर्व गुणवंत उत्तीर्ण विद्यार्थ्यांना पुढील शैक्षणिक वाटचालीसाठी संस्थेचे सचिव डॉ.अशोकराव मोहेंकर,शालेय समिती सदस्य मधुकरराव ढेंगळे,मुख्याध्यापक नवनाथ सुर्यवंशी,सर्व शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी,पालक, गावकऱ्यांनी उत्तीर्ण विद्यार्थ्यांचे अभिनंदन करून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. जय भवानी विद्यालयाचा एकूण निकाल ९१.८ ९% लागला आहे. त्यामुळे प्रशाळेतील गुणवंत विद्यार्थ्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.
More Stories
आमदार विक्रम काळे यांची जय भवानी विद्यालयास सदिच्छा भेट
अनिक फायनान्सियल सर्व्हिसेसमध्ये विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्साहात साजरी
विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त सामान्य ज्ञान स्पर्धा उत्साहात संपन्न