August 10, 2025

अनंत घोगरे यांना साई कलारत्न समाजभूषण राष्ट्रीय पुरस्कार प्रदान

  • कळंब – शिर्डी येथे ओम साई विकास प्रतिष्ठान व बीबीसी फिल्म प्रोडक्शन महाराष्ट्र राज्य निर्मित आयोजित भव्य समारंभात सामाजिक क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याबद्दल धाराशिव जिल्ह्यातील सामाजिक कार्यकर्ते अनंत घोगरे गोविंदपुर यांना राष्ट्रीय स्तरावरील साई कलारत्न समाजभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.हा भव्य व दिव्य पुरस्कार विचरण सोहळा दिनांक. 3.मे.वार शनिवार रोजी सकाळी ठिक. 10:30.वाजता शिर्डीत हाॅटेल शांतीकमल येथे संपन्न झाला. दिव्य साई कलारत्न समाजभूषण पुरस्कार सिने सृष्टीतील व सामाजिक आणि शैक्षणिक क्षेत्रातील नामवंत सेलिब्रिटीज च्या हस्ते तसेच त्यांच्या उपस्थितीत वितरीत करण्यात आले महाराष्ट्र राज्यातील 36.जिल्ह्य़ातील मान्यवर यांचा ट्रॉफी सन्मानपत्र फेटा,शाल,एक बॅग व पुष्पगुच्छ घेऊन सत्कार करण्यात आला.या पुरस्कार सोहळ्यात एकुन 181.मान्यवर व्यक्तिनां साई कलारत्न समाजभूषण पुरस्कार २०२५.देण्यात आले पुरस्कार प्राप्त झाल्याबद्दल अनंत घोगरे यांचे पर्याय सामाजिक संस्थेचे अध्यक्ष विश्वनाथ अण्णा तोडकर,ज्येष्ठ नागरिक महासंघाचे जिल्हाध्यक्ष महादेव महाराज अडसूळ,ज्येष्ठविधीज्ञ त्र्यंबकराव मंनगीरे, गुणवंत कामगार संघटनेचे प्रदेश सचिव अच्युतराव माने,जिल्हा मुख्याध्यापक संघाचे मावळ अध्यक्ष सुरेश टेकाळे,सामाजिक कार्यकर्ते राजाभाऊ आंधळे ,माधवसिंग राजपूत ,सचिन क्षिरसागर यांनी
    अभिनंदन केले आहे.
error: Content is protected !!