May 9, 2025

Home »ई-पेपर बुद्ध घरात दाखवू नका बुद्ध मनात दाखवा – भिक्खू पयानंद थेरो

बुद्ध घरात दाखवू नका बुद्ध मनात दाखवा – भिक्खू पयानंद थेरो

  • लातूर ( दिलीप आदमाने ) – लातूर शहरातील श्रावस्ती बुद्ध विहार ट्रस्ट संचालित श्रावस्ती बुद्ध विहार येथे सकाळी ठीक ११ वाजता पूजनीय भिक्खू संघाचे आगमन श्रावस्तीनगरात झाले.
    बोधी चौकातून भिक्खू संघाचे पुष्पवृष्टी करत सबका मंगल, सबका मंगल होय रे.. च्या जयघोषात श्रावस्ती बुद्ध विहारात आणले.यावेळी विलास घारगावकरांनी याचना केली.भिक्खू संघाने त्रिशरण पंचशील दिले आणि भोजनाला बसले.नगरातील सर्व उपासकांच्या वेगवेगळ्या २२ प्रकारच्या व्यंजनाने भोजन दिले. सर्वांनी मौन पाळत शांतता नि शिस्तीत व भोजनदन केले.ते भिक्खू संघाने आनंदाने स्वीकारले.नंतर श्रावस्ती बुद्ध विहाराच्या सुशोभीकरणासाठी १० लाखाच्या कामाचा शुभारंभ पूज्य भिक्खू पायनंद थेरो,भंते बुद्धशील,भंते बोधिराज,नगरसेविका रागिणी यादव,विहाराचे अध्यक्ष देवीदासबाबा आचार्य,उपाध्यक्ष हिराचंद धायगुडे,सहसचिव सुधीर साबळे,महिला मंडळ अध्यक्षा कुसुम बानाटे,दीक्षा खटके,यांच्या हस्ते टिकाव मारत शुभारंभ केला.मग नगरसेविका रागिणी यादव,आशा चिकटे,जिल्हाध्यक्षा भारतीय बौद्ध महासभा,लातूर,सुशील चिकटे,अध्यक्ष,१३४ वी सार्वजनिक भीमजयती यांचा शाल,फुलहार साडीचोळी,पंचशील स्कार्फ देऊन सत्कार केला.यानंतर भंते पायनंद थेरो यांनी मंगलकारी धम्म देसना दिली.यावेळी भंते म्हणाले काळ भयानक आहे.धम्म जगा.मंगल मैत्री करत बुद्ध घरात दाखवू नका तर बुद्ध मनातून दिसूद्या.धम्म विचारानेच जीवनात समृद्धी येईल.यावेळी सर्व उपासकांनी साधूकार देत धम्मदेशना श्रवण केली
    यानंतर रागिणी यादव,आशा चिकटे,सुशीलकुमार चिकटे यांनीही भाषणे करत धम्मसंस्कार घरात पेरणी करा.शीलसदाराचा आनंद लुटा.बुद्ध जयंती थाटात नि शांततेत करू,सर्वांनी सहभागी व्हा असे आव्हान केले.भिक्खू संघाने आशीर्वाद देऊन निरोप घेतला.यावेळी मोठ्या प्रमाणावर लहान थोर नागरीक हजर होते.सर्वांनी आनंदाने भोजन घेऊन शेवटी ज्योती घारगावकराने धम्म पालन गाथेनी सांगता केली.कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी नितीन कांबळे,पुष्पा शिंदे,विजयमाला सरवदे,संजीवनी गाडेराव,कांताबाई कांबळे,वत्सला जाधव,संजीवनी गुंजुरगे,उज्वल घारगावकर,लालूबाई सुरवसे,पुष्पा गायकवाड,शीतल कांबळे,कविता शृंगारे,प्रतिमा कांबळे,अर्चना माने,छाया ओहळ,सुशीला डोनेराव,शांतिप्रिया सूर्यवंशी,सुकुमार गोरे,सुकुमार कांबळे,वैशाली गायकवाड,मीनाक्षी वाघमारे,क्रांती माने,देवकन्या सरवदे,बळीराम सूर्यवंशी,विष्णू क्षीरसागर,शहाजी कांबळे,VS पँथर्सचे पायाळ उपस्थित होते.कार्यक्रमाचे प्रास्ताविक आणि संचालन बुद्ध विहार सचिव विलास घारगावकर यांनी केले.
error: Content is protected !!